बीड आकाशवाणीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची मुलाखत

 बीड आकाशवाणीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची मुलाखत

बीड, दि.20:(जिमाका) बीड आकाशवाणीवर बुधवारी 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता 39 बीड लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.


आकाशवाणी बीड केंद्राच्या 102.9 मेगाहर्टस् वर बुधवारी दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता ही मुलाखात प्रसारित केली जाईल. ही मुलाखात आकाशवाणीचे निवेदक गोपाल ठाकूर घेणार आहेत. 


 39 बीड लोकसभा मतदार संघात निवडणुकीविषयक प्रशासनाने केलेली तयारी. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून राबवत असलेले विविध जागृतीपर उपक्रमांची माहिती या मुलाखतीत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी देतील. 


बीड आकाशवाणीवरून प्रसारित होणारी ही मुलाखत मतदारांनी ऐकावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार