देशाला महाशक्ती बनवायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही : पंकजाताई मुंडे

 देशाला महाशक्ती बनवायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही : पंकजाताई मुंडे


जिजाऊंच्या जन्मभूमीत संघर्षकन्येचं उत्स्फूर्त स्वागत:पंकजाताई मुंडेंच्या सभेला  सिंदखेडराजात लोटली  अलोट गर्दी


बुलढाण्याची जागा निवडून द्या: बीडबरोबरच मी बुलढाण्याचा आवाज बनून काम करेल


प्रतापराव जाधवांना विजयी करा : विकासाची जबाबदारी माझी

बुलढाणा ।दिनांक २४।

देशात शांतता प्रस्थापित करायची असेल, गरीबांचं कल्याण करायच असेल, जगात भारताला सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही. गोरगरीब, वंचितांची पीडा मोदींनाच आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि बुलढाण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. तुम्ही बुलढाण्याची जागा निवडून द्या ,बीड बरोबरच बुलढाण्याचा आवाज बनून मी काम करेल असा विश्वास भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दुसरबीड तालुका सिंदखेड राजा येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला.

    

   बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ दुसरबीड तालुका सिंदखेडराजा येथे पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंदखेडराजा परिसरातील नागरिकांनी सभेला अलोट गर्दी केली होती. दरम्यान माॅसाहेब जिजाऊंच्या जन्मभूमीत महाराष्ट्राची रणरागिणी व संघर्ष कन्या म्हणून ओळख असलेल्या पंकजाताई मुंडे यांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासह पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,आमदार संजय रायमुलकर,आमदार श्वेता महाले,माजी आमदार तोतारामजी कायंदे,डॉ. शशिकांत खेडेकर, विजयराज शिंदे, आशाताई गोरे आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महायुतीतील घटक पक्षांचे नेतेगण उपस्थित होते.

    पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, सिंदखेड राजा  परिसराशी आपले वर्षांनुवर्षाचे ऋणानुबंध आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे लहानपणी मला नेहमी म्हणायचे की पंकजाताई मी तुम्हाला सिंदखेडराजाला उभे करणार आहे. एवढा विश्वास आणि प्रेम या परिसराबद्दल मुंडे साहेबांच्या मनात होता. मी दर वेळा आवर्जून या परिसरात सातत्याने येत असते. राज्यात मंत्रिमंडळात काम करत असताना परळीच्या बरोबरीने विकासाची कामे सिंदखेडराजा या परिसराला मी दिलेली आहेत. परळी एवढेच प्रेम माझे सिंदखेड राजा परिसरावर आहे. आणि या परिसरातील जनतेचेही तितकेच निरपेक्ष प्रेम माझ्यावर आहे. हे अतूट नाते असून हे अखंडित सुरू राहावे अशीच माझी अपेक्षा आहे. त्यामुळेच मी  स्वतः उमेदवार असताना आणि नेहमीप्रमाणेच कठीण अशी लढाई लढत असताना देखील आवर्जून या सभेला आले आहे.

    अनेक वर्ष तुम्हाला या ठिकाणी धनुष्यबाणावर मतदान मागण्यासाठी  मुंडे साहेबांचा परिवार म्हणून मी आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला प्रचंड मतांनी एक एक शिलेदार दिलेला पाठवायचा आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत. तेव्हा त्यांना मत देणारा एक हात बुलढाण्यात निश्चित जाणार आहे. प्रतापराव जाधव निवडून गेल्यानंतर या सगळ्या मतांचा सन्मान करतील आणि सिंदखेडच्या विकासापासून त्यांच्या कार्याची सुरुवात करतील असा मला पूर्ण विश्वास आहे.देशाला जगातली सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती बनवायचे असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आहे .म्हणून कितीही वेळ देऊन मी ते कष्ट करायला तयार आहे. त्यासाठी प्रतापराव जाधव यांना विजयी करा आणि आपल्या विकासाला एक नवीन दिशा एक नवी उमेद आपण मिळवून द्या असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. 


*मातृतिर्थाची माती कपाळी लावली.....!*

-----

 माॅसाहेब जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून सिंधखेडराजा मातृतिर्थावरून पंकजाताई मुंडे यांनी खास माती आणायला लावली आणि मात्तृतीर्थाची ही माती कपाळी लावत आपल्याला एक प्रचंड ऊर्जा नेहमीच मिळते अशी भावना व्यक्त केली. मातृतीर्थावून आणलेली ही माती मी सदैव माझ्या जवळ बाळगणार असुन ही मातीच मला लढण्याची उर्जा व प्रेरणा देणारी असल्याचे यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !