अभंग चिंतनाऐवजी इतर विषयांचा भडीमार हा चिंतेचा विषय- ॲड दत्तात्रय महाराज आंधळे

अभंग चिंतनाऐवजी इतर विषयांचा भडीमार हा चिंतेचा विषय- ॲड दत्तात्रय महाराज आंधळे 


सिरसाळा (प्रतिनिधी) अलिकडे कीर्तनाची पध्दती बदलली गेली असून कीर्तनात अभंग चिंतनाऐवजी अवांतर विषयांचा भडीमार होत असून हि चिंतेची बाब आहे असे प्रतिपादन संतवाड्.मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.

           येथील शिवराम मंदिरात प्रतिवार्षिक श्रीराम नवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो.या सप्ताहात कीर्तन आंधळे महाराज यांनी, "धर्माची तू मूर्ती/पापपुण्य तुझे हाती//"या अभंगावर सखोल व मार्मिक भाष्य केले.पौराणिक आख्याने व संदर्भ,दाखले देत विवरण केले.ते पुढे म्हणाले की हल्लीची कीर्तन पद्धती हास्य विनोद, वेडेवाकडे नृत्य, अवांतर अनेक विषयांचा धुडगूस होत असून जो अभंगाशी सुसंगत नसतो.अभंग न सोडवता 'तमाशाप्रधान वग' पण लाजेल इतकी अश्लाघ्य व अश्लील भाषा कीर्तनात रूढ झाली.याला कीर्तनकार, तसेच आयोजकच जबाबदार असून ही गंभीर व घातक बाब आहे.

      यावेळी ह.भ.प.श्री वैजनाथराव देशमुख, ह.भ.प. श्रीबाळु महाराज बडे खामगावकर,  ह.भ.प.श्री प्रभाकरराव आघाव , श्री पद्माकर देशमुख, बालू कुंभार ,मृदंगाचार्य पांगरी चे श्री सुरवसे साहेब ,श्री कडबाने आबा, श्री श्याम काळे, श्री भास्करराव देशमुख, श्री कुमारराव देशमुख, श्री दामूअण्णा किरवले,ह.भ.प मारोती देवा वेदपाठक, श्री दिंगबरराव पांडे, प्रमोद खामगावकर, श्री विश्वंभर देशमुख, श्रीवैभव देशमुख, श्री शरदकाका देशमुख ,श्रीबबनराव देशमुख, श्री संजय देशमुख, ॲड . केदार देशमुख,राजाभाऊ कौले तसेच सिरसाळा पंचक्रोशीतील भाविकांची कीर्तनास उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार