नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान: ई केवायसी करुन घ्या -तहसिलदार व्यंकटेश मुंडे

 नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान: ई केवायसी करुन घ्या -तहसिलदार व्यंकटेश मुंडे




परळी वैजनाथ तालुक्यातील शेतकरी यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीभूत पध्दतीने थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणालीमार्फत वितरण करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाआयटी मार्फत विकसीत संगणक प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वितरीत सुरू आहे.


ज्या पात्र लाभार्थी यांना रक्कमेचे प्रदान झाले नाही अशा शेतक-यांची यादी गांव निहाय डकविण्यात आली आहे. या यादीमध्ये प्रत्येक लाभार्थी यांच्यासाठी एक स्वतंत्र क्रमांक तयार करण्यात आला असून त्यास "विशिष्ट क्रमांक "असे संबोधण्यात येते. हा क्रमांक घेवून संबधित शेतकरी यांनी जवळच्या "आपले सरकार केंद्र" या ठिकाणी जावून आधार क्रमांकाद्वारे आपली ओळख पटवावयाची (E-KYC) करायचे आहे. आधार प्रमाणीकरणाची सेवा शेतक-यांसाठी निशुल्क असेल (E-KYC) केल्यानंतर सात दिवसात मदतीची रक्कम थेट शेतक-याच्या खात्यात जमा होईल.


तसेच काही लाभार्थी यांचे आधार बँक खात्याशी संलग्न नसल्याने किंवा त्यांचे खाते सुरु नसल्याने बँकेने अशा रक्कम प्रदान केल्या नाहीत, आशा लाभार्थानी त्यांचा आधार क्रमांक. बँकेत किंवा आधार केंद्रात जावून बँक खात्याशी संलग्न / अध्यावत करावा.वरील कार्यपद्धतीचा अवलंब करून नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी अनुदानाची रक्कम प्राप्त करून घ्यावी.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !