दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

साहित्य म्हणजे जीवनाच तत्वज्ञान. डॉ. व्ही जे चव्हाण

 साहित्य म्हणजे जीवनाच तत्वज्ञान. डॉ. व्ही जे चव्हाण 



परळी वैजनाथ: येथील वैद्यनाथ महाविद्यालयात इंग्रजी विभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिन व जागतिक इंग्रजी भाषा दिन साजरा करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. व्ही जे चव्हाण उपस्थित होते तर उपप्राचार्या डॉ व्ही बी गायकवाड अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी डॉ चव्हाण यांनी जगप्रसिद कवी आणि नाटककार विलियम सेक्स्पियर यांच्या जीवन व लेखणावर प्रकाश टाकला व त्याचे साहित्य म्हणजे जीवनाच तत्वज्ञान आहे असे उदगार काढले. अध्यक्षीय समारोप करत असताना डॉ गायकवाड ह्यांनी वाचन संस्कृतीचे महत्व सांगून वाचाल तर वाचाल असा संदेश दिला. याप्रसंगी ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन करण्यात आले होते या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा डी के आंधळे, डॉ टी ए गीत्ते, प्रा एन एस जाधव, प्रा ए आर चव्हाण, प्रा ए डब्लू वडाळ, डॉ एस ए धांडे,प्रा चाटे, प्रा तिवार तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रंथपाल डॉ धांडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....