बजरंग सोनवणेंचं ठरलं!

 बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन न करता दाखल करणार


  बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे  यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे  यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बजरंग सोनवणे हे दि. 22 एप्रिलला दुपारी एक वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कुठलंही शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय बजरंग सोनवणे यांनी घेतला आहे. 
        त्यांचा अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील तसेच शिवसेनेतील  एक मोठे नेते आणि रजनी पाटील यांची उपस्थिती असणार आहे. तर बीड जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते देखील बजरंग सोनवणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. बीडमध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता 22 एप्रिल रोजी कुठलीही सभा घेणार नसल्याचे सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसेच पत्रकार परिषदेत बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावरदेखील जोरदार टीका केली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार