महायुतीच्या प्रचार रॅलीला परळीत उत्स्फूर्त प्रतिसाद

 पंकजाताई मुंडेंना मतदान करण्यासाठी परळीत मतदारांमध्ये दिसून आला उत्साह


महायुतीच्या प्रचार रॅलीला परळीत उत्स्फूर्त प्रतिसाद


 परळी वैजनाथ,।दिनांक १६।

 बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून परळी शहरातील महायुतीचे कार्यकर्ते जोरदारपणाने प्रचार करताना दिसून येत आहेत. शहरातून पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार परळीकरांनी केला आहे.


  महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शहरात आज सकाळी हनुमान मंदिर मोंढा मार्केट येथून प्रचार फेरी सुरु होवून हालगे गल्ली,गांधी मार्केट,हमालवाडी हिंद नगर,भवानी नगर,मोंढा मार्केट आदी भागात प्रचाराफेरी काढण्यात आली. प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महायुतीने परळी शहरात पस्तीस हजाराहून अधिक मताधिक्याचे उद्दिष्ट ठेवले असून नागरिकांमध्ये पंकजाताई यांना मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे.पंकजाताईंच्या विजयात परळी शहराचे निश्चित मोठे योगदान असणार आहे. या निवडणुकीत  महायुतीतीला अभूतपूर्व यश  प्राप्त होणार आहे. आजच्या या प्रचार फेरीत  भाजप, राष्ट्रवादी,शिवसेना  व घटक पक्षाचे नेतेगण, महिला पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

•••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार