पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाला वाढती पसंती !

 पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाला वाढती पसंती !


धनगरवाडीचे शेकडो कार्यकर्ते भाजपात


बीड ।दिनांक १७।

आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात सर्वसामान्य व्यक्ती व त्याचा सर्वांगीण विकास हाच केंद्रबिंदू मानून लोकनेते मुंडे साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन पुढे चालणाऱ्या संघर्ष कन्या तथा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाला पसंती देत धनगरवाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. 


  केवळ विकास हाच आपला मुद्दा घेऊन  बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या पंकजाताई यांची लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड येथे भाजपा प्रचार कार्यालयात कॉर्नर मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये धनगरवाडी (ता. बीड) येथील तुळशीराम लकडे, सरपंच बारीकराव भावले, उपसरपंच सुखदेव भावले, ग्रा.प. सदस्य बाबुराव बंगाल, अमोल कोकरे, यदाबा भावले, केरबा भावले, तानाजी भावले ,माजी सरपंच ग्यानबा भावले, युवा कार्यकर्ते परमेश्वर भावले, कालिदास ठोकळ रामदास भावले ,यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार