दुखःद वार्ता: प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी यांची महाविद्यालयातच आत्महत्या

 दुखःद वार्ता: प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी  यांची महाविद्यालयातच आत्महत्या



अंबाजोगाई, प्रतिनिधी....
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाजोगाई संचलित बी. एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी यांनी आज सायंकाळी 4:30 वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी 4 वाजता महाविद्यालयाचे नियमित कामकाज व्यवस्थितपणे करुन सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर लगेचच प्राचार्य डॉ. फुलारी यांनी ही आत्महत्या केली असल्याचे समजते.

महाविद्यालयाच्या इमारतीची झाडझुड करीत सेवक प्राचार्य डॉ. फुलारी यांच्या पारदर्शक कॅबिनपर्यंत पोहोचताच त्यांच्या निदर्शनास ही बाब आली आणि त्याने ही माहिती संस्थेच्या इतर कर्मचारी व संचालकांना दिली.

प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी हे गेली अनेक वर्षांपासून या संस्थेने सुरु केलेल्या विविध शैक्षणिक युनीट मध्ये कार्यरत होते. या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून त्यांच्याकडे बरीच वर्षांपासून प्राचार्य पदांची जबाबदारी होती.

बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध उपक्रमातील एक गुणवान, हुषार, अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे प्राचार्य म्हणून डॉ. नंदकिशोर फुलारी यांची ओळख होती. संस्थेच्या सर्व उपक्रमात त्यांचा हिरहिरीने सहभाग असायचा. प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी यांनी नव्यानेच बांधलेल्या घराची वास्तुशांती याच महिन्यात 6तारखेला झाली होती. सर्व व्यवस्थित सुरु असताना प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कार्यालयातच आत्महत्या का केली असा प्रश्न आता समोर आला आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन अहवालासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले आहे. या अहवालानंतर व पोलीस तपासात प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी यांच्या आत्महत्येचे कारण समजेल. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार