आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल

 39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल


 आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल


बीड, दि.20 : (जिमाका) 39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या तिसऱ्या  दिवशी आज 1  उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. 


 39  बीड लोकसभा मतदारसंघातून आज भारतीय जवान किसान पार्टी( इंडिया) पक्षाचे रामा खोटे यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला.  


शुक्रवारी 11 इच्छुक उमेदवारांना 25 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले. तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण 80 इच्छुक उमेदवारांना 185 नामनिर्देशन पत्राचे वाटप झाले.  39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज  दाखल झाले आहेत.


39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

 

सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत राहील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार