सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

 पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी परळीत दिव्यांग,विधवा,जेष्ठ नागरिक व माजी सैनिक यांच्या संवाद बैठकीचे आयोजन : डॉ संतोष मुंडे


सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते  यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

परळी : प्रतिनिधी

      बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ डॉ संतोष मुंडे यांच्या श्रीनाथ हॉस्पिटल हॉल अरुणोदय मार्केट समोर सकाळी ठीक 9:30 वाजता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने, 39-बीड लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या अधिकृत उमेदवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ  राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांच्या: श्रीनाथ हॉस्पिटल हॉल अरुणोदय मार्केट समोर संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद बैठकीस महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे या दिव्यांग, विधवा, जेष्ठ नागरिक व माजी सैनिक यांना संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत . या बैठकीत महायुती व घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते  यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !