आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाचार्य महाराजांनी धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडेंना दिले आशीर्वाद

 लिंगायत समाजाच्या सात धर्मगुरूंची धनंजय मुंडेंनी घेतली आशीर्वादपर भेट


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाचार्य महाराजांनी धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडेंना दिले आशीर्वाद


बीड (दि. 19) - लिंगायत समाजात आदराचे स्थान असलेल्या विविध 7 मठांच्या धर्मगुरू शिवाचार्य महाराजांची आज बीड शहरात धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी सातही शिवाचार्य महाराजांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांना आशीर्वाद दिले.


यावेळी श्री. शांतीलिंग शिवाचार्य महाराज औसेकर, श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, श्री राजलींग शिवाचार्य महाराज परांडकर, श्री कांचबसवेश्वर शिवाचार्य महाराज पाथरीकर, श्री विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर, श्री चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर, श्री चंदबसव महालिंगेश्वर महाराज बरदापुरकर या सातही शिवाचार्य महाराजांचे आज धनंजय मुंडे यांनी बीड शहरात एकत्रित दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी धर्म रक्षणासाठी राजाश्रय नितांत गरजेचा असल्याचे मान्यवर शिवाचार्य महाराज यांनी म्हटले.


आम्ही नाथरेकर म्हणजे शिवाचे सेवक, आम्हाला महादेवाच्या सेवेचे व्रत आहे. आजही प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग सेवेचे मानकरी हे नाथरेकर आहेत. घडेल ती सेवा आम्ही करतो परंतु राजकारण आणि अध्यात्म नेहमी वेगळे ठेवायचा प्रयत्न करतो. असे याप्रसंगी धनंजय मुंडे म्हणाले. 


दरम्यान सातही शिवाचार्य महाराज यांनी आपले आशीर्वाद मुंडे बंधू भगिनींच्या पाठीशी असल्याचे एकमुखाने व्यक्त करत आशीर्वाद दिले. निवडणुका येतील जातील मात्र सेवा, भक्ती, धर्म आणि त्याच्या सोबतीला राजाश्रय असायला हवा, अशी सकारात्मक चर्चा याप्रसंगी झाली. तसेच विविध संस्थानचे बर्दापूर, पुणे, वानवडी यांसह विविध जागेचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण शब्दबद्ध आहोत, असेही धनंजय मुंडे चर्चे दरम्यान म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !