आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात चार सभा

 पंकजाताई मुंडेंचा उद्यापासून जाहीर सभांचा धडाका


आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात चार सभा ; जाटनांदूर, उंदरखेल, आष्टी व मुगगावात तोफ धडाडणार


बीड ।दिनांक १७।

भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराचा तिसरा टप्पा जाहीर सभांच्या माध्यमातून उद्या (ता. १८) पासून सुरू होत आहे. आष्टी- पाटोदा मतदारसंघातील जाटनांदूर, उंदरखेल, आष्टी व मुगगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होणार असून मतदारसंघातील विविध गावांचा दौराही त्या  करणार आहेत.


 पंकजाताईंना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपसह महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कामाला लागले असून गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. उद्या १८ एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता पंकजाताई जाटनांदूर (ता.शिरूर कासार) येथे पहिली सभा घेणार असून त्यानंतर सकाळी १० वाजता उंदरखेल ता.आष्टी येथे सभा होणार आहे.  सभेनंतर पंकजाताई मुंडे दुपारी १२ ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत दादेगाव, देवळाली, श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव मायंबा या ठिकाणी भेटी देत मतदारांची संवाद साधणार आहेत. सायंकाळी पाच वाजता आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा संपन्न होईल. या सभेला आष्टी शहरासह मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदार उपस्थित राहणार आहेत. आष्टीची सभा आटोपून त्या सायंकाळी ६.३० ते ७.१५ दरम्यान तालुक्यातील पोखरी, पांढरी व ब्रह्मगाव येथे त्या भेटी देतील. नंतर सायंकाळी ७.३० वाजता मुगगाव ता.पाटोदा येथे त्या जाहीर सभेस संबोधित करतील.या सभांना मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार