समाजाचे हित लक्षात घेऊनच ज्योतीताईंचा निर्णय -कैलास नाईकवाडे पाटील

 समाजाचे हित लक्षात घेऊनच ज्योतीताईंचा निर्णय -कैलास नाईकवाडे पाटील



परळी वैजनाथ, प्रतिनिधी
          समाजाचे सर्व व्यापक हित लक्षात घेऊनच डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी निर्णय घेतला असून हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाचे समाजातून स्वागत होत असून या निर्णयाने समाजाचे सर्व व्यापक हित साधले जाणार असल्याची प्रतिक्रिया शिवसंग्राम तालुकाध्यक्ष कैलास नाईकवाडे पाटील यांनी दिली आहे.

         बीड लोकसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी निवडणूक आहे. शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे यांनी आपण बीड लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांची भेट ही घेतली होती. परंतु ज्योतीताई मेटे यांना उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर ज्योतीताई मेटे यांनी संवाद दौरा बीड जिल्ह्यात केला. हा संवाद दौरा झाल्यानंतर समाज बांधवांशी चर्चा करून त्यांनी बीड लोकसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे अशी प्रतिक्रिया शिवसंग्राम तालुकाध्यक्ष परळी वै. कैलास नाईकवाडे पाटील यांनी दिली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !