उमापूरच्या सभेत मतदारांचा एकमुखी निर्धार- पंकजाताईच आता विक्रमी मताधिक्याने खासदार

 जातीपातीचं सोडा, सारे मिळून आता जिल्ह्याच्या मातीचं बघुया - पंकजाताई मुंडे


उमापूरच्या सभेत मतदारांचा एकमुखी निर्धार- पंकजाताईच आता विक्रमी मताधिक्याने खासदार






उमापुर (गेवराई) ।दिनांक १९।

मी सत्तेत असताना कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही असे काम केले आहे. विकास कामात कधीही भेदभाव केला नाही. तो संस्कार आमचा नाही. अनेक वर्ष राजकारण करताना  सर्वांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. मी मंत्री असताना केलेली कामे जनता मला सांगते. मात्र काही जणांकडून विनाकारण जातीपातीचा अपप्रचार केला जातोय.हे योग्य नाही आणि बीड जिल्ह्यातील सुज्ञ जनता याला बळीही पडणार नाही याची मला खात्री आहे. मी तर सर्वांना जाहीर आवाहनच करतेय की, अरे, जातीपातीचं काय घेऊन बसलात  विकासाच्या दृष्टीने सर्व जण हातात हात घालून जिल्ह्याच्या मातीचं बघुया. खासदार म्हणून संधीरुपी कर्ज द्या विकासातून त्याच्या परतफेडीचा हिशोब घ्या असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी उमापुर येथील जाहीर सभेत केले.

    उमापुर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचंड जाहीर सभा त्या बोलत होत्या. सभेला पंचक्रोशीतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर गीताभाभी पवार, शिवराज पवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभूवनकर, ॲड सुरेश हत्ते, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, शाम कुंड, प्रा. पी टी चव्हाण, रासपचे परमेश्वर वाघमोडे, शिवसेनेचे सिनूभाऊ बेदरे, मनसेचे जयदीप गोल्हार यांची प्रमुख उपस्थिती होती.


  यावेळी  पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, मी राजकारणात कधीही कुठला भेदभाव केला नाही. तुम्हीही मतदार म्हणून करणार नाहीत याची खात्री आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात काम करण्याची संधी मला द्या. संसदेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना बीड जिल्ह्यात येणाऱ्या पाच वर्षात उद्योग व्यवयाय आणून  रोजगार उपलब्ध करेल.जिल्हा दुष्काळ मुक्त करण्यासाठी काम करणार आहे. त्यामुळे मतदार म्हणून विकासाच्या कामांना आपले भरीव योगदान देण्यासाठी तुमचे मतरुपी कर्ज मला द्या विकासातून त्याच्या परतफेडीची हिशोब घ्या असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले.


माझ्या विकास कामांचे रेकॉर्ड तपासून मला संधी द्या

----

माझ्या मंत्रिपदाच्या काळातील विकास कामांचे रेकॉर्ड समोर ठेवून तुम्ही मला भरघोस मतांनी निवडून द्या. बीड जिल्ह्याच्या विकासाचे भरीव काम  करून दाखवेल. मंत्री असताना कसे काम केले आहे. विकासाचे किती प्रश्नमार्गी लावले हे सर्वांना माहिती आहे, कारण मी राज्य मंत्रिमंडळात मंत्री असताना केलेले काम दिसणारे आहेत. खासदार म्हणून तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असेही त्या म्हणाल्या.


*मी व्यापकतेने प्रश्न सोडवू शकते*

-------------

 दिल्लीत मला मोदींजींशी ओळख करून देण्याची गरज भासणार नाही. मोदीजीना हक्काने हाक दिली तर ते म्हणतील  'बोल पंकजा' असे नाते निश्चितच आहे.मी व्यापकतेने प्रश्न सोडवून विकासकामे करू शकते. हे समोर ठेऊन तुम्ही मला मतदान करावे असे आवाहनही यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केले.


मी तुमची हक्काची खासदार असेल

-------

निवडून आल्यानंतर मतदार संघातील मतदारांचे पण चांगले भविष्य असावे लागते. मतदारांचे हे चांगले भवितव्य आणण्यासाठी मला उमेदवार म्हणून तुम्ही मतदान करावे. सर्व योजना आणि निर्णय घेताना कोणताही भेदभाव केला नाही कधी करणारही नाही.तुमचे मत मी वाया जाऊ देणार नाही. जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमचा हक्काचा माणूस म्हणून मी दिल्लीत काम करेल. त्यामुळे या निवडणुकीत चूक न करता जिल्ह्याच्या सर्वकष विकासासाठी प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजप-महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !