परळीत २१ एप्रिल पासून डॉ आंबेडकर जयंती निमित्त फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन

 परळीत २१ एप्रिल पासून डॉ आंबेडकर जयंती निमित्त फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन


परळी(प्रतिनिधी):-     परळीत कर्मचारी, पेंशनर्स व व्यवसायिक यांनी एकत्र येऊन विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आदर्श जयंती उत्सव समितीची स्थापना करून 14 एप्रील रोजी परळी शहरातून ' महात्मा फुले- डॉ बाबासाहेब आंबेडकर ' संयुक्त जयंती काढून शहरातील लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला, आणि आाता आज दिनांक 21 एप्रिल पासून व्याख्यानमाली सुरुवात होणार आहे.

    फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेतून दिनांक 21 एप्रील ते 26 एप्रील या काळात शहरातील वैद्यनाथ औद्योगिक वसाहत, सभागृह येथे दररोज सांय. 7:00 ते 9: 00 यावेळेत विविध विषयावर व्याख्यान देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यामध्ये दि21 एप्रील रोजी संभाजीनगर( औरंगाबाद) येथील फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक मा अरविंद खैरनार हे ' डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत सत्यशोधक चळवळीचे योगदान' या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर दि23 एप्रील रोजी प्रा डॉ मनोहर सिरसाट यांचे ' डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीत सहभाग' तर दि24 एप्रील रोजी डॉ भदंत उपगुप्त महाथेरो यांची धम्मदेसना - विज्ञान आणि मानवी मूल्ये हाच धम्माचा मूलाधार या विषयावर होणार आहे.

     दि25 एप्रील रोजी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा हनुमंत भोसले यांचे - अंधश्रद्धा- समज/ गैरसमज , प्रयोगासह सादरीकरण यावर व्याख्यान व प्रयोग होणार आहे , हा कार्यक्रम सुंगधकुटी बुद्ध विहार मैदान, भिमनगर येथे होणार आहे. दि26 एप्रील रोजी सांय. 7:00 वाजता ' महामानवाच्या वेशभूषा स्पर्धा व विद्यार्थ्यांचे ग्रूप डान्स, अशा विविध विषयांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत . या सर्व व्याख्यान आणि कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार