ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी

 स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्था: 74 लाख 9 हजार निव्वळ नफा

ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी


परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.

   शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात मार्च 2024 अखेर उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. 74 लाख 9 हजार निव्वळ नफा झाला. 

      सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2024 अखेर संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी- 38कोटी 25 लाख,कर्ज 31 कोटी 72 लाख, गुंतवणूक 13कोटी 32लाख,आर्थिक उलाढाल 130कोटी 93लाख, राखीव निधी 5 कोटी 71लाख,भाग भांडवल-69लाख 97हजार,खेळते भांडवल-48कोटी 97लाख,निव्वळ नफा 74लाख 9 हजार इतका आहे. पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक यांचा विश्‍वास हेच पाठबळ आहे असे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले. यापुढेही हा विश्‍वास सार्थ ठरवून वाटचाल करु अशी ग्वाही पतसंस्थेचे अध्यक्षबाजीराव भैय्या धर्माधिकारी , उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे, रवि मुळे,दशरथ होळकर, डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी  यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार