12 th फेल चित्रपट कथानकाची परळीत पुनरावृत्ती :10th टाईम्स 10 th फेल !

 12 th फेल चित्रपट कथानकाची परळीत पुनरावृत्ती :10th टाईम्स 10 th फेल !

बापाचा नाद खुळा ! मुलगा १० वेळा नापास तरीही जिद्द कायम;अखेर ११ व्या प्रयत्नात १० वीला गाठलं ‘मॅजिक सक्सेस’


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      12 th फेल या सत्यकथेवर आधारलेल्या चित्रपटच्या कथानकाची परळी तालुक्यात  पुनरावृत्ती झाल्याचे उदाहरण १० वी च्या निकालानंतर समोर आले आहे. अतिशय रंजक वाटावी अशी ही सत्य कथा असून तब्बल १० वेळा दहावीला नापास झालेल्या आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत पास होईपर्यंत परीक्षा द्यायलाच लावायची या जिद्दीला पेटलेल्या वडिलांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. आज जाहीर झालेल्या निकालात ११ व्या प्रयत्नात या मुलाने अखेर मॅजिक सक्सेस मिळवले आहे मिळवले आहे. या गोष्टीचा त्याच्या कुटुंबीयालाच नाही तर अख्या गावाला आनंद झाला आहे.

         १२ वी फेल हा २०२३ चा विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित, निर्मित आणि लिखित भारतीय हिंदी-भाषेतील चरित्रात्मक नाट्य चित्रपट आहे. हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी बनण्यासाठी अत्यंत गरिबीवर मात करणाऱ्या मनोज कुमार शर्मा यांच्याविषयी अनुराग पाठक यांच्या २०१९ च्या नामांकित नॉन-फिक्शन पुस्तकावर आधारित आहे. या चरित्रात्मक नाट्य चित्रपटाच्या कथानकाशी अगदी तंतोतंत जुळणारीच कथा वाटावी अशा प्रकारचे सत्य उदाहरण परळी तालुक्यात दहावी परीक्षेच्या बाबतीत बघायला मिळाले आहे. परळी तालुक्यातील डाबी या गावचे रहिवासी असलेल्या सायनस उर्फ नामदेव मुंडे यांचा कृष्णा हा मुलगा सन 2018 या वर्षात दहावीला होता. 2018 ची दहावीची परीक्षा दिल्यानंतर तो या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. वडील सायनस उर्फ नामदेव मुंडे हे अगदी सर्वसामान्य कामगार आहेत. संपूर्ण जीवन अतिशय कष्टात व बांधकामावर कामगार म्हणून काम करण्यात त्यांनी घालवले आहे. काहीही झाले तरी आपला मुलगा दहावी पास झाला पाहिजे ही मनोमन इच्छा त्यांच्या मनात होती. त्यामुळे नापास झाले तरी हरकत नाही तू पास होईपर्यंत परीक्षा देत रहा असे म्हणत त्यांनी कृष्णा या आपल्या मुलाला आजपर्यंत परीक्षा द्यायला लावली.

         तब्बल दहा वेळा नापास झाल्यानंतर आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अकराव्या प्रयत्नात कृष्णाला अखेर जादुई यश मिळाले आहे. या यशाने वडील सुखावून गेले असून त्यांना आपले आनंदाश्रू ही रोखता आले नाही. एवढेच नाही तर अख्या गावाला या यशाचा इतका आनंद झालेला आहे की, कृष्णाने उत्तुंग यश मिळवल्यासारखे अभिनंदन त्याचे संपूर्ण गाव करत आहे. अकराव्या प्रयत्नात दहावी पास होणाऱ्या कृष्णाला अक्षरशः डोक्यावर घेऊन गाव आनंद व्यक्त करत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला कृष्णा एक प्रकारे सद्यस्थितीला डाबीकरांचा हिरो बनला आहे.

         दहावीच्या निकालात शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे कौतूक केले जाते. मात्र, १० वेळा  सर्वच विषयात  नापास होऊन ११व्या प्रयत्नात ‘मॅजिक सक्सेस ’ गाठणाऱ्या कृष्णाचे सर्वच स्तरातून विशेष कौतूक होत आहे. दहावी परीक्षेत नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळण्यासाठी यंदा जणू स्पर्धाच सुरु होती. जिल्ह्यात तब्बल ८५ टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. मात्र, परळी वैजनाथ तालुक्यातील डाबी या गावात निकालाचा आगळा वेगळा आनंद साजरा केला जात आहे. कृष्णा हा टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याच्या या आगळ्या वेगळ्या यशाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. 

@@@

       याबाबत डाबी येथील गावकऱ्यांनी सांगितले की, कृष्णाची घरची परिस्थिती अगदी बेताची असून आईवडिल दोघेही मजुरी करतात. कृष्णाही मजूरीची छोटी मोठी कामे करतो.शाळेतील परीक्षेचे शुल्क भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे तरीही त्याच्या वडीलानी जिद्द सोडली नाही.परीक्षेच्या काळातही पेपर संपल्यानंतर तो वडिलांसोबत मजुरी करत होता. नियमित कामाला जात असल्यामुळे आपण परीक्षा देवू शकणार नाही, असे त्याने वडीलांना सांगीतले होते. पण, वडीलांनी त्याला सतत परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज तो अखेर उत्तीर्ण झाला असुन सध्या मित्रांकडून त्याच्या गुणपत्रकाचा फोटो व्हाट्सॲप, फेसबूकवरुन व्हायरल करुन कौतूक केले जात आहे. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार