मतमोजणीच्या कालावधीत मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 लागू

मतमोजणीच्या कालावधीत मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 लागू


बीड, दि. 29 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 रोजी सन 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत  केला असून कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आहे. 39- बीड लोकसभा मतदारसंघाचे मतदान दिनांक 13 मे 2024 रोजी झाले असून विधानसभा निहाय मतमोजणी, दिनांक 04 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, नाथापूर रोड बीड येथे विधानसभा निहाय सकाळी 8.00 वाजेपासून होणार आहे.

बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या ठिकाणी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय/उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व ईतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन व निवडणूक कामाव्यतिरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

जिल्हादंडाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी कळविले आहे  फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्यये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाव्दारे असे निर्देश देत आहे की, शासकीय तंत्र निकेतन नाथापूर रोडच्या 200 मीटर परीसरातील सर्व पक्ष कार्यालय/उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, फॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व ईतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे उमेदवाराचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

हा आदेश निवडणूकीची कामे हाताळतांना कायदा वर सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन दिनांक 04 जून 2024 रोजी सकाळी 06.00 वा. पासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावी असेही आदेशीत करीत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार