युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त 31ते 7 विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन: रविवारी रक्तदान शिबीर

शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त 31ते 7 विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन


रविवारी रक्तदान शिबीर


परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)

        येथील शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनैश्वर जन्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार (ता.३१) ते शुक्रवार (ता.०७) करण्यात आले आहे.

         येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर व सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताह, श्री.ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात शुक्रवारी (ता.३१) ते शुक्रवार (ता.०७) पर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. गुरुवारी (ता.०६) संध्याकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होईल, यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हा महाप्रसाद शनिमंदिर मध्ये होणार आहे.  त्याचबरोबर शुक्रवारी (ता.३१) सकाळी ८ वाजता शोभायात्रा हनुमान मंदिर मोंढा येथून राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक मार्गे शनी मंदिरात काढण्यात येणार आहे.तसेच रविवारी (ता.०२) भव्य रक्तदान शिबीर सकाळी आठ ते पाच यावेळेत आयोजित केले आहे. धार्मिक कार्यक्रमात रोज सकाळी शिवपाठ, परमरस्य पारायण, शनि महात्म्य पारायण, गाथा भजन, प्रवचन आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. शनिमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या