परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

प्रत्येक तालुकानिहाय नियंत्रण कक्ष

 वादळी वारे व वीज पडल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान व पशुधनाची हानी: तातडीने पंचनामे करण्याचे  जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश


बीड, प्रतिनिधी.....
           दि. २५ / २६ मे रोजी बीड जिल्ह्याच्या काही भागात वादळी वारे व वीज पडल्यामुळे शेतीपिकांचे व पशुधनाची हानी झालेली आहे. या नूकसानीची पाहणी करुन पंचनामे करण्याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी सुचना देण्यात आलेल्या आहेत.
       बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी सर्व तहसिल कार्यालयांमध्ये नायब तहसिलदार महसूल यांचा समावेश असलेला नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. कोणत्याही नागरिकांना नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत काही माहिती ‌द्यावयाची असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती. दीपा मुधोळ मुंडे, जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.


प्रत्येक तालुकानिहाय नियंत्रण कक्ष
अ.क्र.
१. बीड (श्री. सुरेंद्र डोके) ९४२२७४२६७५
२.गेवराई (श्री. सुभाष कट्टे)     ८४८४९१४४४४
३.शिरूर (श्री. शिवनाथ खेडकर) ९९२२६२२०२५
४.वडवणी (श्री. संजय जिरंगे)
९५५२०६४७६७
५.धारूर (श्री. प्रकाश गोपड)
७२७६७३४४८८
६.अंबाजोगाई (श्री. सचिन देशपांडे)
   ९९२१७६४४४४
७.केज (श्री. लक्ष्मण धस) ९८५०४२८३८३
८.परळी (श्री. बाबुराव रुपनर) ९४२२९३०५४२
९.पाटोदा (श्री. संतोष बन) ९४२२५५०८९०
१०.आष्टी (श्री. बाळदत्त मोरे) ७७१९९५०९९९
११.माजलगाव (श्री. परमेश्वर चाफाकानडे) ९४०४२४१८८३

Video.....

 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!