पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन

इमेज
पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन नागपूर ।दिनांक ०४।  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज नागपूर येथे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.    बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे   सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते, आज दुपारी त्यांनी नागपूरला जाऊन बावनकुळे यांची व त्यांच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी प्रभावती बावनकुळे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ••••

सौ.संध्या नागुरे (चौधरी) यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान

 सौ.संध्या नागुरे (चौधरी) यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान


परळी वैजनाथ/प्रतिनिधी

येथील विद्यावर्धिनी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. संध्या नागुरे (चौधरी) यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालय परळी वैजनाथ येथील उपक्रमशील शिक्षका सौ. संध्या विश्वनाथ नागुरे यांना महाराष्ट्र शिक्षण पॅनल (एमएसपी) च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार नाशिक येथील गुरूदक्षिणा हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे, कवी अनंत राऊत, शिक्षण फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक चामे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकिकरण्यासाठी, राष्ट्रनिष्ठा समाजनिष्ठा ज्ञाननिष्ठा विद्यार्थी निष्ठेपाई कार्य करणार्‍या शिक्षक शिक्षकांचा नाशिक येथे 24 मे रोजी आयोजित सोहळ्यात सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शिक्षक पॅनल बीड जिल्हा जिल्हा समन्वयक वैशाली अकुस्कर (बुरांडे) यांची प्रमुख उपस्थिती होती.

सौ संध्या नागूरे मॅडम या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी 2006 पासून तिसरी व सहावी वर्गासाठी एमटीएस स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून मोलाची कामगिरी बजावली आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा देत असतात. शालेय स्तरावरील विविध सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांचा सहभाग वाढवून आपल्या शाळेसाठी विविध पारितोषिके मिळून दिली आहेत. मुलांना आनंददायी पद्धतीने शिक्षण देणे हा प्रामाणिक उद्देश राहिला असून गरजू मुलांना विविध शैक्षणिक साहित्याची वाटप करून त्यांना नेहमी प्रोत्साहन करत असतात. कोविड काळातही आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन सदरील पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सदरील पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सौ संध्या नागुरे मॅडम यांचे विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून अभिनंदन होत आहे.


Video.....

 









आहे.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?