प्रासंगिक लेख:✍️प्रा.डॉ.सिद्धार्थ आबाजी तायडे ●गुरुवर्य प्रा.सुरेश पुरी :अथांग स्नेहसागर

 गुरुवर्य प्रा.सुरेश पुरी :अथांग स्नेहसागर


"काही माणसं असतात 

पिंपळाच्या पानासारखी

कायमच हृदयाच्या

पुस्तकात राहण्यासारखी"

आदरणीय प्रा. सुरेश पुरी सर,म्हणजे  विद्यार्थ्यांवर निरपेक्षपणे प्रेम करणारा अथांग स्नेहसागर!

जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक गोष्टीपासून, व्यक्ती पासून काही ना काही शिकत असतो. आणि म्हणून तर आपण जगण्यायोग्य बनत जातो .प्रत्येक गोष्ट ही आपल्याला शिकवण देते .ती आपली गुरुच असते.आपल्या आयुष्यात शिक्षकांची/गुरूंची खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. विद्यार्थ्यांवर चांगले आणि योग्य संस्कार करण्याची.  मनाला विविध पैलू पाडण्याचे काम उत्तम प्रकारे जी व्यक्ती करीत असते ती व्यक्ती म्हणजे आपले गुरू!प्रा. सुरेश पुरी सर,म्हणजे विद्यार्थ्यांना घडविणारे विद्यापीठच..प्रत्येक विद्यार्थ्याला मग तो वर्गातील असो किंवा वर्गाबाहेरील असो पुरी सर प्रत्येकावर आत्मीयतेने संस्कार करीत असतात. स्वतःच्या आचरणाने त्यांच्यात चांगले गुण परोपकार,त्याग,शौर्य इतरांशी वागण्याची पद्धत मोठ्यांविषयी आदर, सर्वांसाठी प्रेमाची भावना इत्यादी चांगल्या बाबी विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतात. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सातत्याने त्यांना ज्ञानदान करण्याचा जणू त्यांनी ध्यासचं घेतलेला आहे. सेवानिवृत्त होऊन दशक ओलांडूनही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. शैक्षणिक किंवा वैयक्तीक समस्या दूर करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.आदरणीय काकू अर्थात विजयमाला पुरी तेवढ्याचं प्रेमळ आणि विशाल हृदयी आहेत. पोटच्या लेकरांप्रमाणेच सर्व विद्यार्थ्यांवर मायेची पखरण करणारी माऊली. मी पुरी सरांचा तसा वर्गातील विद्यार्थी नसलो तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असताना आणि आजही ते मला गुरुस्थानी आहेत. प्रा. सुरेश पुरी म्हणजे अफाट लोकसंग्रह असणारे माणुसकीने श्रीमंत असणारे व्यक्तिमत्त्व. संपूर्ण देशभर त्यांनी मित्र मंडळी जोडली आहेत. जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, हिंदी भाषा प्रचार सभेचे लोकप्रिय मार्गदर्शक म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे.

सन्माननीय प्रा. सुरेश पुरी सरांनी घडविलेले असंख्य विद्यार्थी देश-विदेशात महत्वपूर्ण पदांवर असून निष्ठेने जनसेवा करीत आहेत.आज आपण जे काही आहोत ते गुरुवर्य पुरी सरांमुळेच हीच कृतज्ञता माझ्यासह अनेकजण व्यक्त करीत असतात.ज्ञानाचा-अधिकाराचा तीळमात्र अहंकार त्यांच्याकडे नाही. अत्यंत साधेपणा-सच्चेपणा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रद्धेय पुरी सर.

 प्रा.  सुरेश पुरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. देशभरातील शेकडो पत्रकार, जनसंपर्क अधिकारी आणि संपादकांचे  गुरू म्हणून प्रा. सुरेश पुरी यांची ख्याती आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलासारखे शिकवणाऱ्या  प्रा. सुरेश पुरी यांनी अनेक माध्यमांतून सातत्याने लिखाण केले आहे. या वयातही शेकडो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून प्रा. सुरेश पुरी यांनी त्यांचा शिक्षकी पेशा कायम ठेवला आहे. त्यांची अनेक पुस्तके ही आहेत. इतरांना मदत करायची,त्यातून कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. आपल्या मदतीतून आपला शिष्य उभा कसा राहील याची सातत्याने काळजी घेणाऱ्या प्रा.सुरेश पुरी यांच्या नावाने व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारितेत शिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप सुरू करण्यात येत आहे.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने ३ लाख रुपयांची ही स्कॉलरशिप राहणार असून निवडप्रकियेतून पात्र ठरलेल्या गरजू विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येणार असल्याचे  बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय महिला संघटक सारिका महोत्रा, प्रदेशाध्यक्ष राजा माने, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष (ग्रामीण) अनिल म्हस्के पाटील, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, बालाजी मारगुडे, संजय मालाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.सरांच्या कार्याचा गौरव म्हणजे ही स्कॉलरशिप होय.

   आपल्या जीवनात अनेक  व्यक्ती येतात त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळते. परंतु आदरणीय गुरुवर्य प्रा. सुरेश पुरी सरांसारख्या एका व्यक्तीमुळे आपले जीवन बदलते. जो आपल्या जीवनाचा सारथी बनतो. आपल्याला योग्य वळणावर नेतो. एक मोठा व्यक्ती बनण्यास मदत करतो. अशा गुरुचे आपण सदैव ऋणातच असायला हवं!सन्मित्र विनोद लांडगे यांनी मराठी वाड्;मयात पी.एचडी.संपादन केल्याबद्दल त्यांचा हृदय सत्कार आदरणीय सर आणि काकूंच्या हस्ते करण्यात आला. आम्ही दोघेही सोबत होतो.सन्मित्र डॉ. विनोद लांडगे,नीलिमा लांडगे,गोविंद शेळके,मुकुंद चिलवंत ,डॉ. गणेश चंदनशिवे,डॉ. अनिलकुमार साळवे,डॉ. संजीवनी साळवे,डॉ. संजय पाईकराव,डॉ. सचिन बनसोडे ,डॉ. संतोष दत्ता रणखांब,डॉ. तेगमपुरे,प्रकाश मोगल इत्यादी अनेक सन्मित्र मंडळी आदरणीय पुरीसरांचा आणि काकूंचा जिव्हाळा अनुभवला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सामाजिक कार्य महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर-औरंगाबाद आयोजित

दैदीप्यमान प्रवासाची ४४वर्षे

स्मृति संगम २०२४ या उपक्रमात आदरणीय गुरुवर्य सुरेश पुरी सर

 आपल्या सेवेचा, कर्तृत्वाचा आणि गुणांचा संपन्न असा वारसा लक्षात घेऊन आपला जीवनगौरव पुरस्काराने सन्मान  करण्यात आला.

आपली सामाजिक कार्य या विषयाची तळमळ खूप प्रेरणादायी आहे, म्हणूनच मराठवाड्यात

आपण समाजकार्य शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.या महान कार्यास ४४ वर्षे पूर्ण झाली. आपल्या अध्यापन कार्यातून आणि शैक्षणिक उपक्रमांमधून वेळोवेळी विद्यार्थ्याप्रती असलेली तळमळ प्रकट झालेली आहे.

आपले शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातले ही योगदान इतरांसाठी पथदर्शी असेच आहे.

विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून तुम्ही राबवलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारे ठरले आहेत व ठरत आहेत. जनसंपर्क व वृत्तविद्या या विभागाचे प्रमुख असताना आपण राबवलेले उपक्रम सर्वांसाठी मैलाचे दगड

ठरले आहेत.

आपण समाधानाने आपली संपूर्ण सेवा विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी प्रदान केली आहे. आपण सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपली कारकीर्द घडवली. त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत.

रंगभूमी-चित्रपट-साहित्य-सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रामाणिक धडपडीचा बहुमान केला .तो माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षणच! 

आदरणीय सर,

तुमच्या जीवनात आनंदसूर्य उगवत राहो, 

तुमचं आयुष्य फुलांप्रमाणे बहरत  राहो....

आपणांस दिर्घ, आरोग्यदायी व आनंददायी आयुष्य लाभो हीच जन्मदिनी प्रार्थना....!! स्वत:ला समृध्द करीत असताना  इतरांनाही समृद्ध करण्याचा आपला हा प्रवास आणि प्रयास असाच निरंतर चालू राहो..! 

आमच्या पाठीवरचा तुमचा कौतुकाचा हात सदैव राहो ही नम्र अपेक्षा....!

जन्मोत्सवाच्या आत्मीय शुभेच्छा!


✍️ प्रा.डॉ.सिद्धार्थ आबाजी तायडे

(9822836675)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?