बारावी निकाल: यंदाही मुलींचीच बाजी

 बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभागाची बाजी, मुंबईचा निकाल सर्वात कमी


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल. त्यानंतर आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा ही संपलीये. आज बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आज 21 मेला आपला निकाल पाहू शकणार आहेत.
   महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के इतका लागला. एकूण 14 लाख 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
यावर्षी एकूण 14 लाख 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के इतका लागला आहे. 8782 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर यंदा केवळ एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण मिळवण्यात यश आलं आहे.

दरम्यान पुन्हा एकदा कोकण विभागानं बारावीच्या निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त 97.51 टक्के इतका लागला आहे. पुणे 94.44 टक्के, नागपूर 92.12 टक्के, छत्रपती संभाजी नगर 94.08 टक्के, कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36 तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 91.95 टक्के निकाल लागला आहे.



12th Result: नऊ विभागीय मंडळ निकाल

Maharashtra Board HSC Result: 


पुणे ९४.४४


नागपूर ९२.१२


छत्रपती संभाजीनगर ९४.०८


मुंबई ९१.९५


कोल्हापूर ९४.२४


अमरावती ९३.००


नाशिक ९४.७१


लातूर  ९२.३६


कोकण ९७. ५१

Maharashtra Board HSC Result: यंदाही मुलींना मारली बाजी

Maharashtra Board HSC Result: मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 95.44 अशी आहे.


Maharashtra Board HSC Result:  मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 91.60 अशी आहे.

यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ

12th Result: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

१३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण

एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Maharashtra Board HSC Result LIVE: बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल? 



• mahresult.nic.in


• http://hscresult.mkcl.org


• www.mahahsscboard.in


• https://results.digilocker.gov.in


• http://results.targetpublications.org



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार