संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

बारावीचा निकाल:यशस्वितांचे अभिनंदन

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम


परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी

        लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाने १२ वी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के तर कला शाखेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. तर काँलेजचा एकुण निकाल ९७ टक्के लागला आहे.

             शहरातील लक्ष्मीबाई देशमुख कनिष्ठ महिला महाविद्यालयाने बारावी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून काँलेजचा निकाल ९७ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून कला शाखेचे विद्यार्थिनी ऋतुजा परमेश्वर कुंभार (७९.८३) प्रथम, द्वितीय प्रिती शिवलिंग कुंभार (७८.१७), तृतीय विद्या अजय गंगाधरे (७७.६७), तर विज्ञान शाखेतून प्रथम ज्योती बालाजी जुनाळ (७८.३३), द्वितीय- मधुरा सचिन पोखरकर (७८.१७), तृतीय- मयुरी संतोष गोरे (७७.८३) क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, प्रा. प्रविण फुटके,प्रा प्रविण नव्हाडे, प्रा अशोक पवार, प्रा विशाल पौळ, प्रा आशिलता शिंदे, प्रा विना भांगे, प्रा आचार्य सह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....