इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

प्रवाशांना विविध सेवा उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे

 प्रवाशांना विविध सेवा उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे    


       
                     

   गेवराई:- गेवराई शहरातील बस स्थानकावर विविध सेवा निदर्शनास येत नाहीत त्यावर योग्य ती कार्यवाही करून विविध सेवा पुरविण्यात याव्यात अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी गेवराईतील आगारप्रमुख यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केलेले आहे व त्यावर प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली निवेदनावर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. गेवराई बस स्थानकात थंड पिण्याचे पाणी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी. गेवराई बस स्थानकातून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी बस उपलब्ध नाही. गेवराई येथून भाविक नाशिक व शिर्डी येथे जात असतात तसेच नोकरीनिमित्त गेवराई तालुक्यातील बरीच मंडळी नाशिक येथे आहे. तसेच अनेक विद्यार्थी संगमनेर व लोणी येथे शिक्षणासाठी जात असतात परंतु त्यांना सोयीस्कर अशी बस उपलब्ध नाही. गेवराई आगारातून नाशिक येथे जाण्यासाठी एकही बस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाशिक येथे जाण्यासाठी नियमित बस सेवा सुरू करण्याबाबत सर्वांकडून मागणी करण्यात आली. गेवराई बस स्थानकात गाडी पार्किंगची व्यवस्था असणे आवश्यक आहे त्यासाठी तात्पुरत्या येणाऱ्या गाड्या यांना पार्किंग दर आकारू नयेत. दिवसभर राहणाऱ्या गाड्यांसाठी अल्प दरा प्रमाणे आकारणी करावी. बस स्थानक स्वच्छता असणे आवश्यक आहे. यासाठी स्वच्छ परिसर ठेवण्यात यावा तसेच स्वच्छता ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. नाथ जल पाणी पंधरा रुपये याप्रमाणे प्रवाशांना देण्यात यावे याबाबत जास्तीचे आकारणी करण्यात येऊ नये. याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. बस स्थानकातील खाद्यपदार्थ विक्रीचे दर पत्रक लावण्यात यावे. जास्तीच्या दराने विक्री होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. बस स्थानकावरील एसटी बस बाबत प्रवाशांना भ्रमणध्वनीय द्वारे माहिती उपलब्ध केली जात नाही याबाबत योग्य ती कारवाई व्हावी. आगारातील गाड्या सुस्थितीत वेळेवर सोडणे आवश्यक आहे तसेच आपल्या आगारातून नवीन गाड्या मागणी करून उपलब्ध करून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात याव्यात. ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांच्या शाळा जूनमध्ये सुरू होत असून त्यांची गैरसोय होणार नाही  त्यासाठी वेळेवर बसस्थानकातून गाड्या सोडण्यात याव्यात. गेवराई बस स्थानकावरील प्रवेशद्वारावरील खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे व स्थानकातील इतर खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.                                   तरी वरील बाबीची दखल घेऊन याप्रकरणी पंचायत शाखा बीड यांना अवगत करावी ग्राहक पंचायत शाखा गेवराई व आपली संयुक्त बैठक घेऊन आपण केलेल्या कारवाईची माहिती बैठकीत देऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरणे आवश्यक आहे तरी वरील निवेदनावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. सदरील निवेदन देताना ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अनिल बोर्डे गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा. भानुदास फलके प्रा. ए. ए. चव्हाण इंजिनियर नारायण अवधूत गणेश रामदासी प्रमोद कदम  मोहन राजहंस आर जी थळकर आधी हजर होते










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!