जिल्ह्यात ग्राहकांना योग्य दरात वाळू उपलब्ध करून द्या- अनिल बोर्डे

 जिल्ह्यात ग्राहकांना योग्य दरात वाळू उपलब्ध करून द्या- अनिल बोर्डे      



                                            

   गेवराई :- बीड जिल्ह्यात व गेवराई तालुक्यात गेवराई शहरामध्ये बांधकाम ग्राहकांना कमी किमतीत  रकमेमध्ये वाळू मिळावी असे शासनाचे धोरण असताना प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागते याबाबत बीड जिल्हा ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्रप्रमुख अनिल बोर्डे यांनी गेवराई येथील नायब तहसीलदार श्री संजय जी सोनवणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.                  सध्या बीड जिल्ह्यात व इतर नद्यांमधून व गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास येत आहे . यावर शासनाने वेळीच  कार्यवाही  करणे आवश्यक आहे. परंतु तसे होताना निदर्शनास येत नाही. त्यामुळे ग्राहकांना वाळू चढ्या दराने घ्यावी लागते. त्यामुळे शासनाचा महसूल देखील वसूल होत असल्याचे दिसत नाही. त्यामध्ये शासनाची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ग्राहकाची देखील पिळवणूक होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे ग्राहकांना योग्य दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी वेळीच होऊन लिलाव प्रक्रिया पारदर्शक प्रमाणे  राबविणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्यात ग्राहकांना योग्य दरात वाळू मिळेल याबाबत ठोस उपाययोजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे. यामध्ये ग्राहक हित जोपासण्यातील याप्रमाणे कारवाई होणे अपेक्षित आहे. यामध्ये ग्राहकाची पिळवणूक होणार नाही याबाबत योग्य ती कार्यवाही युद्ध पातळीवर होणे आवश्यक आहे. निवेदन देताना बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अनिल बोर्डे गेवराई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रा. भानुदास फलके  प्रा. ए. ए. चव्हाण इंजिनीयर नारायण अवधूत गणेश रामदासी मोहन राजहंस आर जी थळकर आधी जण हजर होते.


Video.....

 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार