मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
परळीत उद्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अभिवादन रॅली व शोभायात्रेचे आयोजन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळीत उद्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अभिवादन रॅली व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहेत.
सकल धनगर समाजाच्या वतीने परळी वैजनाथ येथे उद्या 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रम होणार आहे.होळकर चौक परळी वै. येथे सकाळी 9 वा. ध्वजारोहण होईल त्यानंतर पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अभिवादन रॅली निघणार आहे.होळकर चौक, गणेशपार, अंबेवेस मार्गे ही रॅली वैद्यनाथ मंदिर येथे जाईल. वैद्यनाथ मंदिरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे पुजन व अभिवादन करण्यात येईल.सायं.4 वा. होळकर चौक ते राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जयंती समिती अध्यक्ष आकाश कुकर, सचिव किशोर सरवदे,वैजनाथ लांडे, नितीन सरवदे,मुंजा सरवदे,विष्णु सरवदे, धर्मा सरवदे यांच्यासह स्व. बापु बिरु वाटेगावकर सेवाभावी संस्था अध्यक्ष राम कुकर, उपाध्यक्ष बजरंग सरवदे,सटवा सरवदे,अमोल सरवदे, सचिव जगाडे, संभाजी फुके,शिवाजी सरवदे,माणिक कुकर, राम सरवदे,राजाभाऊ धुमाळ, भरत होळकर आदींनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा