तलवारीचे घाव घालून गाडी फोडली

 तलवारीचे घाव घालून गाडी फोडली



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

  परळीतील पद्मावती गल्ली या शहरातील शांत व सुसंस्कृत भागातील एका प्रमुख भाजप कार्यकर्त्याची घरासमोर लावलेली गाडी तलवारीचे घाव घालून फोडल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,  राहुल रामचरण केंद्रे वय 41  रा. पद्मावती गल्ली परळी वै, हे आपल्या कुटुंबासह गेल्या अनेक वर्षांपासून या भागात राहतात. दि. 18/05/2024 रोजी सायंकाळी 8.00वा. सुमारास  त्यांची क्रेटा SX .MH -25, AD 2599 ही पद्मावती गल्लीतील हनुमान मंदीरा समोर लावलेली होती. आरोपी आकाश लिंबाळकर रा. पद्मावती गल्ली हा  कारवर तलवारीने मारून काचा फोडत आहे असे राहुल केंद्रे यांना गल्लीतील लहान मुलांनी येवुन सांगीतले. राहुल केंद्रे ताबडतोब गाडीजवळ गेले तेंव्हा आकाश लिंबाळकर हा गाडीच्या डाव्या बाजुला व बोनेटवर दगड मारून पाठीमागील काच तलवारीने फोडत होता.त्यास फोडु नको असे म्हणताच तो पळुन गेला.त्याने आपल्या गाडीचे नुकसान केले. अशाप्रकारची फिर्याद राहुल केंद्रे यांनी पोलीस ठाण्यात दिली.

       या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२७,शस्त्र अधिनियम १८५९ चे कलम ४, शस्त्र अधिनियम१९५९ चे कलम २५  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार