टंचाईग्रस्त भागांचा दौरा करणार

 परळी तालुक्यात भीषण पाणीटंचाई : ठोस उपाययोजना करावी- ॲड अनिल मुंडे


परळी वैजनाथ दि १९ (प्रतिनिधी) :-

परळी शहराबरोबरच तालुक्यातील बहुसंख्य भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी वन  वन भटकावे लागत आहे. प्रशासनाने होत असलेली पाणीटंचाई गांभीर्याने घेत सदर भागाची पाहणी करून पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर मध्ये वाढ करून नागरिकांना होत असलेली पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा परळी तालुका कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड अनिल मुंडे यांनी केले आहे.

परळी शहराबरोबरच तालुक्यात होत असलेल्या पाणीटंचाई बाबत लक्ष केंद्रित करण्यासाठी उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर तथा परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे ॲड अनिल मुंडे यांनी वरील प्रमाणे मागणी केली आहे. निवेदनात म्हंटले आहे की, नेहमीपेक्षा मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे पाणी पातळी खोलीवर गेल्यामुळे परळी तालुक्यात गावोगावी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बऱ्याच भागातील बोर आटले असून साठवण तलाव देखील कोरडे ठाक पडले आहेत परिणामी नागरिकांबरोबरच जनावरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे. प्राप्त माहितीनुसार प्रशासनाच्या वतीने कांही प्रमाणात टंचाईग्रस्त भागात पाण्याची टँकर सुरू केले आहेत मात्र पाणीटंचाईच्या प्रमाणात हे टँकर अपुरे पडतात. प्रशासनाने ग्रामीण भागात तर नगरपरिषदेने शहरी भागात पाण्याची ठोस उपाययोजना करावी जेणेकरून नागरिक पाण्यासाठी त्रस्त होणार नाहीत व भटक्या तथा पाळीव जनावरांना पिण्याची पाण्याची सोय होईल अशीही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा परळी तालुका कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड अनिल मुंडे यांनी केली आहे.

             

टंचाईग्रस्त भागांचा दौरा करणार

मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे परळी शहराबरोबर तालुक्यात पाणी पातळी खोलवर गेली आहे परिणामी पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. शासनाच्या वतीने मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक पाणी समस्येने घेरले आहेत. आपण लवकरच परळी तालुक्यातील ग्रामीण भागात दौरा करून टंचाईग्रस्त गावांची पाहणी करणार आहोत जेणेकरून प्रशासनाचे टंचाई ग्रस्त भागाकडे लक्ष केंद्रित करण्यात येईल असेही ॲड अनिल मुंडे यांनी सांगीतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?