कु. कौशिकी महेंद्र कुलकर्णी हिचे दहावी बोर्ड परीक्षेत उतुंग यश
कु. कौशिकी महेंद्र कुलकर्णी हिचे दहावी बोर्ड परीक्षेत उतुंग यश
गेवराई :- सेंट झेवियर्स स्कूल गेवराई, कु. कौशिकी महेंद्र कुलकर्णी हिने राज्य माध्यमिक शाळांत परीक्षेत 95% गुण घेऊन प्रथम श्रेणीत येण्याचा बहुमान मिळविला आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कु. कौशिकी महेंद्र कुलकर्णी हिने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये 95% गुण घेऊन यश संपादन केले आहे. कु. कौशिकी ही महेंद्र कुलकर्णी हे ग्रामीण रुग्णालय उमापूर येथे कार्यरत आहेत त्यांच्या कन्या आहेत. सौ. विजयश्री महेंद्र कुलकर्णी ग्राहक पंचायत महाराष्ट्र गेवराई येथील सदस्य आहेत. कु. कौशिकी हिने अथग परिश्रम करून सातत्य पूर्ण अभ्यास करून यश संपादन केले आहे. कु. कौशिकी ही खूप गुणवान असून लहानपणीपासून विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. कु . कौशिकी हिने इंग्लिश विषयात 95 ,मराठी 89, गणित 95,सायन्स अँड टेक्नॉलॉजी 96,सोशल सायन्स 95, मार्क असे 500 पैकी 475 मार्क घेतले आहेत. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या यशाबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्र बीड जिल्हा उपाध्यक्ष व श्री जगदंबा सेवाभावी संस्था गेवराई चे अध्यक्ष अनिल बोर्डे गेवराई ग्राहक पंचायत चे अध्यक्ष प्रा. भानुदास फलके, मोहनराव राजहंस, महादेव शुक्ला , कुंदा जोशी आजी व आदीनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा