कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा तलावात बुडून मृत्यू
कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा तलावात बुडून मृत्यू
आष्टी, एमबी वृत्तसेवा
तालुक्यातील पिंपळगाव घाट गावामध्ये रहिवाशी वैष्णवी शंकर घोडके या त्यांच्या मुलांसोबत म्हणजे समर्थ घोडके सोबत गावालगत केळ पिंपळगाव व पिंपळगाव घाट या दोन्ही शिवाराच्या मधोमध असणाऱ्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या होत्या कपडे धुत असताना मुलगा समर्थ तलावामध्ये बुडत असताना पाहुन त्याची आई म्हणजे वैष्णवी यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली परंतु त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात या दोन्ही मायलेकरांचा तलवात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.२५ मे रोजी दु.३ वाजण्याच्या सुमारास घडली
या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे, उपनिरीक्षक भडके, केदार, गर्जे,पैठने हे घटनास्थळी पोहोचुन पंचनामा केला व मृतदेह.
शव विच्छेदन साठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा