डॉ.अमन जयेंद्र बरारा आयबीए अवॉर्डने सन्मानित

 डॉ.अमन जयेंद्र बरारा आयबीए अवॉर्डने  सन्मानित


नांदेड दि.23 मे प्रतिनिधी
        सुयोग किड्स अँड इंटरनॅशनल स्कूल, नांदेडच्या प्राचार्या डॉ. अमन जयेंद्र बरारा यांना शैक्षणिक क्षेत्रातील 'सर्वोत्कृष्ट शिक्षक' म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिल्लीच्या हायपॅड्ज मीडिया ग्रुपने आंतरराष्ट्रीय प्रतिभा पुरस्कार 2024 ने सन्मानित केले आहे.
       डॉ.अमन बरारा या अनेक वर्षांपासून नांदेडमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांचे महागुरू महावतार बाबाजी, त्यांचे गुरुदेव गुरु राजिंदर सिंग जी आणि त्यांचे सासरे स्व. योगेंद्रपाल बरारा यांना समर्पित केला आहे..पती जयेंद्र बरारा यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने त्यांनी आजपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन नांदेड शहरातील करण्यात येत आहे.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !