वीस हजारांची लाच घेताना कोतवालाला पकडलं; केजचे तहसीलदार फरार
वीस हजारांची लाच घेताना कोतवालाला पकडलं; केजचे तहसीलदार फरार
केज : रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचा तहसीलदार अभिजित जगताप हा देखील यात आरोपी असून तो फरार झाला आहे. ही कारवाई धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री १० वाजता केली.
एसीबीने अनेक कारवाया करूनही बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सूरूच आहे. अभिजीत जगताप हा केजचा तहसीलदार आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल असून जगताप याच्यासाठी वसूलीचे काम करतो. केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार पाटील याने २० हजारांची लाच मागितली होती. हीच लाच कोतवाल माने याने स्विकारली. परंतू तहसीलदार जगताप हा फरार झाला आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील दुसरी कारवाई बीड जिल्ह्यात केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा