पावसाळ्यापूर्वी सरस्वती नदी व शहरातील नाले सफाई त्वरित करावी - अश्विन मोगरकर

 पावसाळ्यापूर्वी सरस्वती नदी व शहरातील नाले सफाई  त्वरित करावी - अश्विन मोगरकर




परळी वैजनाथ

पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपला तरी शहरातील नाले सफाईची कामे नगरपरिषद प्रशासनाने न केल्याने पावसाळ्यात घर दुकानात पाणी शिरून नुकसान होऊ शकते हे टाळण्यासाठी त्वरित नगरपरिषद प्रशासनाने नालेसफाई करावी अशी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

परळी नगर परिषदेच्या मार्फत दरवर्षी नाले सफाई मोहीम मे महिन्यात केली जाते. परंतु यावर्षी  नगरपरिषदेच्या निवडणुका न झाल्याने लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. मुख्याधिकारी कधीही शहरात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याचे दिसून येत नाहीत. नगर परिषद मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यास असमर्थ ठरत आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, सरस्वती नदीची सफाई केली जाते. यावर्षी गावभागात असलेली सरस्वती नदी कचरा, प्लास्टिक, झाडेझुडपे व माती दगडांनी अक्षरशः भरून गेली आहे. नगरपरिषदेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा कुठलाही धाक नसल्याने अनेकांनी उघड उघड बांधकामातून उरलेले माती दगड व इतर साहित्य सरस्वती नदीत टाकले आहेत. नदीत वाढलेल्या झाडेझुडपामुळे नदी झाकून गेली आहे. कचऱ्यामुळे डुकरांच्या मुक्त संचारामुळे आजूबाजूच्या नागरिकांचा त्रास वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी सफाई विभागाने अंबेवेस पुलाच्या बाजूला थातूर मातूर सफाई केली. वरवरचा कचरा उचलला परंतु अंबेवेस पासून पुढे कचरा मातीचे ढीग तसेच ठेवल्याने पावसाळ्यात पाणी अडून घरा दारात जाण्याची शक्यता आहे.  

पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नदी नाले सफाई न केल्याने आगामी पावसाळ्यात अंबेवेससह गावभागतील नागरिकांच्या घर दुकानात पाणी शिरू शकते. होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील यामुळे त्वरित सरस्वती नदीसह नालेसफाई करावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?