परभणी पोलीसांनी सराईत गुन्हेगाराला परळीतून उचलले !

 परभणी पोलीसांनी सराईत गुन्हेगाराला परळीतून उचलले !



परळी वैजनाथ  ,प्रतिनिधी

      परभणी जिल्ह्यासह परभणी शहरातील ठाण्याअंतर्गत वाढलेल्या मोटारसायकल चोरीचा आढावा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी घेत तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार केले. पथकाने या चोरीचा छडा लावत आंबाजोगाई.येथील रहिवासी असलेल्या आरोपीला परळी येथून सापळा लावून मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून 20 मोटारसायकली जप्त केल्या. त्या आरोपीची चौकशी
केल्यानंतर परभणी, सोलापूर व लातूर जिल्ह्यातील
दहा गुन्हे केल्याची कबुली दिली.
         या अनुषंगाने फौजदार अजित बिरादार, अंमलदार बालासाहेब तुपसमुंद्रे, रवी जाधव, रफियोद्दीन शेख, निलेश परसोडेख हुसैन पठाण, सायबरचे गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, गौस पठाण यांच्या पथकाने गोपनीय मिळालेल्या माहितीवरून अखिल महेबूब शेख (रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई जि. बीड, ह.मु. परभणी) याने मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोठ्या शिताफीने  परळी येथून त्याला ताब्यात घेतले.गुन्हे शाखेचे सपोनि. भारती, मुत्तेपोड, फौजदार गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार यांच्याअधिपत्याखालील चार पथकांनी आरोपी अखिल याने दिलेल्या माहितीवरून बीड, परळी, लातूर, मरूड, बार्शी, सोलापूर अशा विविध ठिकाणांहून 20 मोटार सायकली हस्तगत केल्या.
         या चोरीतील मोटार सायकलींची विल्हेवाट लावणारा त्याचाआणखी एक साथीदार असून त्याच्याकडे काही मोटारसायकली असल्याची माहिती आरोपी अखिलने पोलिसांना दिली.आरोपीकडून परभणी जिल्ह्यातील सहा, सोलापूर दोन व लातूर जिह्यातील दोन असे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.आरोपी अखिलला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार