इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

वैद्यनाथ कॉलेजची यशाची परंपरा कायम

 वैद्यनाथ कॉलेजची यशाची परंपरा कायम


 परळी, प्रतिनिधी....

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2024मध्ये  घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.

     जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज ,परळीचा विज्ञान शाखेचा.95.94% टक्के व कला शाखेचा 80.35% व व वाणिज्य शाखेचा 94.60.50% एम सी व्ही सी चा 84.00% निकाल लागला आहे. कला  शाखेतून अनुक्रमे प्रथम व तृतीय आणि क्रमांकाने प्रथम-दहीभाते चैताली सचिन 86.83,द्वितीय-रोडे तृष्णा गौतम 77.67,तृतीय-सोनार उत्तम बलभीम 74.50,वाणिज्य शाखेतून  वाणिज्य शाखेतून प्रथम-कुंभार ऋतुजा सतीश 83% द्वितीय- गोस्वामी गिरीजा लक्ष्मीकांत -75.83   तृतीय- काडवडे अनिकेत महादेव-73.33 तर विज्ञान शाखेतून चौधरी शरयू  रामेश्वर 86.33%,नागरगोजे  श्रीनिवास  श्रीहरी 86.16 %,लांडगे  ॠतुराज  महादेव  86.%, झंवर  पुष्कर  केदर  86.%होकेशनल शाखेतील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातून शिंदे मनीषा अंकुशराव 73% चि. तेलंग सोमेश्वर दशरथ 66.17%, मोरे आरती लक्ष्मण 62.83% तर इलेक्ट्रिकल्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातून चि चोपडे रोहित दादाराव 71.17%,चि. निरडे श्याम विष्णू 68.83%, रोडे आदित्य तात्याराव 68.33% गुण घेऊन अनुक्रमे प्रथम   द्वितीय व तृतीय क्रमांकाने यश संपादन केलेले आहे. 

        विशेष म्हणजे महाविद्यालयातील मुलींनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. या यशाबदल जवाहर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.सदाशिवआप्पा मुंडे ,प्रा.टी.पी मुंडे , फुलचंद कराड, सचिव  दत्ताप्पा इटके, कोषाध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सहसचिव डॉ सुरेश चौधरी, सहसचिव श्री विजयकुमार वाकेकर, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ पी एल कराड व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ आर डी राठोड,उपप्राचार्य , प्रा डी के आंधळे, डॉ व्ही.बी गायकवाड, उपप्राचार्य,प्रा हरीश मुंडे,  विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा उत्तम कांदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!