निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
रेणुबाई देवी विद्यालयालाचा निकाल 98.86 टक्के
निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
बीड|प्रतिनीधी
दि.27ः वडवणी तालुक्यातील देवडी येथील रेणुबाई विद्यालयाचा निकाल 98.86 टक्के लागला असून 88 पैकी 48 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर उर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांनी विद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली असून शार्दुलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहनराव सोळंके (काका) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयातून कु .रेवती कैलास बादाडे हिने (92.40) टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर द्वितीय क्रमांक कु.अनुराधा विठ्ठल घाडगे हिने (89.40) टक्के तसेच तृतीय क्रमांक चि.सौरभ सिध्देश्वर होके याने (88.60) टक्के घेऊन विद्यालयाची यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी संस्थेचे सचिव आर.व्ही सोळंके, तसेच शाळेचे मुख्याध्यापक पंडित तिडके,सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आह
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा