दुर्दैवी ........

 गाढ झोपेत असताना अंगावरून गेला टिप्पर; २ तरूणांचा मृत्यू



बीड: खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोकलेन बाजूला उभा करून त्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत झोपलेल्या दोन पोकलेन ऑपरेटरला टिप्परने चिरडल्याची दुर्देवी घटना घडली. ही घटना आज (रविवार) पहाटे पाली परिसरात उघडकीस आली. या घटनेत दोन्ही ऑपरेटरचा जागीच मृत्यू झाला असुन पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
        या विषयी अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यात एका ठिकाणी पोकलेन, जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन सुरू होते. मुरूम भरण्यासाठी त्या ठिकाणी टिप्पर देखील आलेले होते. काल (शनिवार) रात्री खोदकाम झाल्यानंतर पोकलेनचे ऑपरेटर सुभाष कुमार चव्हाण (वय 35 रा. बिहार) आणि समाधान बाळु थोरात (वय 23 रा. सावरगाव ता. बीड) हे दोघे जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात झोपले होते.

मध्यरात्री त्या ठिकाणी मुरूम भरण्यासाठी आलेले टिप्पर क्र.एम.एच.23. ए.यु. 2003 हा रिव्हर्स घेत असतांना त्याने पाठीमागे पाहिलेच नाही. त्यामुळे टायरखाली आल्याने झोपेत असलेले सुभाष कुमार चव्हाण आणि समाधान थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही. आज पहाटे ही दुर्देवी घटना उघडकीस आली. सदरील टिप्पर ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतला असुन ते खोदकाम कोठे सुरू होते ? चालक कोण होता ? याचा पोलीस तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?