हरिद्वार व दिल्ली येथील विद्वानांची मौलिक व्याख्याने

 माता कौशल्यादेवी लोहिया यांच्या गौरवार्थ परळीत त्रिदिनात्मक "मातृवंदना" समारंभ   ‌   


हरिद्वार व दिल्ली येथील विद्वानांची मौलिक व्याख्याने 


 परळी वैजनाथ,दि.२०- 

                      शहरातील ज्येष्ठ नागरिक व दानशूर आदर्श माता श्रीमती कौशल्यादेवी रामपालजी लोहिया यांच्या ९१ व्या वर्षपूर्तीनिमित्त येत्या २४, २५ व २६ मे  रोजी भव्य स्वरूपात "मातृवंदना" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षदा मंगल कार्यालयात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी हरिद्वार येथील पतंजली विद्यापीठाचे प्रति- कुलगुरू व प्रसिद्ध वैदिक विद्वान प्रो. डॉ. महावीरजी आचार्य व दिल्ली येथील प्रसिद्ध भजनगायिका श्रीमती अमृता शास्त्री यांची उपस्थिती लाभणार असून त्यांचे दररोज  आध्यात्मिक, धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर अमूल्य असे मार्गदर्शन लाभणार आहे. 

          तिन्ही दिवशी दररोज सकाळी ९ ते १ वा. व संध्याकाळी ५ ते ९ वा. यजुर्वेद पारायण यज्ञ, भजन संगीत व विविध मौलिक विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने संपन्न होतील . तिसऱ्या दिवशी सकाळी मान्यवर विद्वान, साधू महात्मे,संन्यासी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत माता कौशल्यादेवी लोहिया यांच्या कृतार्थ जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा " मातृ वंदना" सोहळा होईल. यात आयुष्कामेष्टी यज्ञ, ग्रंथतुला, सत्कार व इतर कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. तरी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?