गझलकार दिवाकर जोशी यांना यावर्षीचा नाना बेरगुडे स्मृती गझलयात्री पुरस्कार जाहीर

 गझलकार दिवाकर जोशी यांना यावर्षीचा नाना बेरगुडे स्मृती गझलयात्री पुरस्कार जाहीर




परळी वै. दि. 29/05/24 (प्रतिनिधी) नाना बेरगुडे स्मृती समिती सेलू जि.परभणी यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा आणि मराठी गझलेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा नाना बेरगुडे स्मृती गझलयात्री पुरस्कार यावर्षी परळी येथील सुप्रसिध्द गझलकार दिवाकर जोशी यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र काव्यक्षितिजावर , विशेषतः गझलेच्या प्रांतात अल्पावधीतच दिवाकर जोशी यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. तंत्रशुद्ध गझललेखन करून आपल्या प्रभावी सादरीकरणाने त्यांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली आहेत.  आशय आणि अभिव्यक्ती यांच्या अभिन्नत्वामुळे व गेय गझल सादरीकरणाने त्यांची गझल रसिकमनात कायमस्वरूपी घर करून राहते. त्यांच्या सातत्यपूर्ण, दर्जेदार व महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या गझललेखनाची दखल घेऊन समितीने आज या मानाच्या पुरस्काराची घोषणा केली. पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच एका विशेष समारंभात त्यांना  हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

दिवाकर जोशी यांच्या या गौरवशाली सन्मानाबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव डॉ.राजकुमार यल्लावाड, उपाध्यक्ष प्राचार्य अरुण पवार, कार्याध्यक्ष शाहीर अनंत मुंडे, कोषाध्यक्ष प्रा.संजय अघाव, शिक्षक नेते बंडू अघाव, प्रा.सिद्धार्थ तायडे, पत्रकार रानबा गायकवाड, फोटोग्राफर सुनिलनाना फुलारी, कवी बालाजी कांबळे, कवी केशव कुकडे, कवी सिद्धेश्वर इंगोले, गणपत गणगोपालवाड, प्रा.राजाभाऊ धायगुडे, किरण आटोळकर, किरण महाजन, दिलिप बनसोडे व पंचक्रोशीतील  साहित्य, शिक्षण व सर्व स्तरातील मंडळींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !