मांडवा येथे भव्य दिव्य २१ दिवशीय देवयज्ञ याग सनातन बालसंस्कार शिबीर व पंचधुना तपस्या सोहळ्याचा मंगळवारी समारोप

 मांडवा येथे  २१ दिवशीय देवयज्ञ याग सनातन बालसंस्कार शिबीर व पंचधुना तपस्या सोहळ्याचा मंगळवारी समारोप 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

           श्री क्षेत्र काळभैरव देवस्थान मांडवा यांच्या वतीने भव्य दिव्य २१ दिवसीय देवयज्ञ याग सनातन बालसंस्कार शिबिर व पंचधुना तपस्या सोहळाचे बुधवार दि.०१ मे ते मंगळवार दि.२१ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा समारोप मंगळवार दि.२१ रोजी ह. भ. प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

          नवीन पिढी ही आध्यात्मिक संस्कारापासून बाजूला जात आहे. त्यांना चांगला संस्कार मिळावा आणि त्यांच्यात सुसंस्कार रुजावा यासाठी, लहान मुलांसाठी बालसंस्कार शिबिर   परळी तालुक्यातील मांडवा येथे श्री क्षेत्र काळभैरव देवस्थान मांडवा यांच्या वतीने भव्य दिव्य २१ दिवशीय देवयज्ञ याग सनातन बालसंस्कार शिबीर व पंचधुना तपस्या सोहळ्याचे सुरुवात बुधवार दि.०१ मे २०२४  व मंगळवार दि.२१ मे २०२४ रोजी समारोप होणार आहे. प.पू.गुरुदेव श्री श्री १००८ श्री योगी सोमवारनाथ महाराज (रमलोके १८ के पूर्व महंत) विशेष उपस्थिती होते. २१ दिवशीय दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ८ यज, ८ ते १० शिवलीलामृत ग्रंथ वाचन, १० ते १२ गुणवंताची भेट, सायं. ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० हरिजागर व श्री. ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी, श्री. ह.भ.प. विठ्ठल महाराज उखळीकर, श्री. ह.भ.प. विनायक महाराज गुट्टे गुरुजी, श्री. ह.भ.प. प्रभाकर महाराज झोलकर, श्री. ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगांवकर, श्री. ह.भ.प. वसुदेव महाराज शास्त्री, गोपीनाथगड साधूसंतांचा सहवास व आशीर्वाद लाभला आहे. उद्घाटन सोहळा श्री. ह.भ.प. विनायक महाराज गुट्टे गुरुजी डॉ. श्री. संतोषजी मुंडे साहेब (उपाध्यक्ष-दिव्यांग विभाग, महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबीरासाठी उपस्थित विशेष तज्ज्ञ डॉक्टर शुक्रवार, ३ मे २०२४ डॉ. श्री. दिनेशजी लोढा (दंतरोग तज्ञ)  डॉ. सौ. नताशा दिनेशजी लोढा (दंतरोग तज्ञ), मंगळवार, १४ मे २०२४, डॉ. सौ. शालिनीताई कराड (स्त्रीरोग तज्ञ, बुधवार, १५ मे २०२४ डॉ. श्री. हरिश्चंद्रजी वंगे (एम. एस. सर्जन) आरोग्य शिबीर घेण्यात आले.  तपस्वी सोममणी महाराज, आचार्य ससेंद्रजी व  श्री. पुरुषोत्तम चोथवे गुरुजी (वेदशास्त्र संपन्न), श्री. अंबादास पोखरकर गुरुजी,श्री. रमाकांत पंडितराव कुलकर्णी  यज्ञाचार्य म्हणून उपस्थिती होते. ज्ञानयज्ञ सोहळ्यात २१ दिवस दररोजचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या ज्ञानयज्ञ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील आणि पंचक्रोशीतील सिध्द साधक, वारकरी संप्रादयातील मांदियाळी, महनीय व्यक्ती, श्रोते तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आरोग्य क्षेत्रातील नामांकित मंडळी उपस्थित होते. शिबिराचे हे पहिले वर्ष आहे. परिसरातील गावातील ८० मुले यात सहभागी झाली होती. या २१ दिवशीय ज्ञानयज्ञ सोहळा व बालसंस्कार शिबिरामुळे श्री काळभेरव मंदिर परिसर भक्तीमय झाले आहे. श्री श्री १०८ अनंत महाराज शास्त्री यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरासाचा समारोप मंगळवार दि.२१ रोजी ह. भ. प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?