इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्राचे नसल्याचा दावा

 शरद पवार गटाचे सर्व आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले: आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्राचे नसल्याचा दावा




लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिये दरम्यान बारामती, अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे. या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या वतीने बुथ हायजॅक करण्यात आल्याचा आरोप देखील शरद पवार गटातील नेत्यांनी केला होता. या संदर्भातले काही व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होत होते. मात्र हे व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 चे नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया ही सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे, असा दावा देखील निवडणूक आयोगाने केला आहे.


या संदर्भात निवडणूक आयोगाने एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. निवडणूक आयोग म्हणाला की, 'काही व्यक्ती निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहचवणारी कृती करतानाचे, आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत छेडछाड करत असल्याच्या इतर राज्यांमधील जुन्या चित्रफिती समाज माध्यमांवर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चित्रफिती लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे.'

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने निवडणूक प्रक्रिये दरम्यान मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काही व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर पोस्ट केले होते. तसेच काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओची तपासणी निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये हे व्हिडिओ इतर राज्यातील जुने असल्याचे निदर्शनास आले असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Video news








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट