मोठ्या संख्येने उपस्थित रहा-अनिल बोर्डे

 ब्राह्मण समाजाचे 30 जूनला छत्रपती संभाजीनगर येथे अधिवेशन




गेवराई :- ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे 30 जूनला ब्राह्मण अधिवेशन होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी दिली. अधिवेशनाला नाशिकचे ॶॅड. भानुदास शौचे, महंत सुधीर पुजारी,  उद्योजक विवेक देशपांडे, खासदार मेधा कुलकर्णी. आदि मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिक्षण , रोजगार व शासकीय सवलती परशुराम विकास महामंडळाची शासनाचे मंजुरी आदी विषयावर चर्चा होणार आहेत. अधिवेशनाचे नियोजन खजिनदार ,उदय मुळे, उपाध्यक्ष मोरेश्वर मार्डीकर, वैभव कुलकर्णी, ऍड प्रसाद देशमुख, संजय क्षीरसागर, संतोष जोशी, दत्तात्रय पिंपळे, लक्ष्मीकांत दडके, धनजंय नारळे, आदी करत आहेत.                         .         बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी अधिवेशनाला मोठ्या संख्येने हजर राहावे असे  आवाहन ब्राह्मण महा शिखर परिषद तालुका अध्यक्ष अनिल बोर्डे, अशोक देऊळगावकर, मोहन राजहंस, गणेश रामदासी आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार