तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने आयोजन

 तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने 15 जून रोजी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन बालासाहेब जगतकर   

                  

 परळी प्रतिनिधी-- परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने दिनांक 15 जून 2024 रोजी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. 

      दहावी व बारावीनंतर काय या विषयावर मार्गदर्शन ही होणार असून या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ही तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने परळी शहरातील भीम नगर साठे नगर प्रबुद्ध नगर रमान नगर इत्यादी नगरच्या दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची कुणीतरी थाप मारावी जाने करून त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दहावी बारावी नंतर काय या विषयावर अनेक मान्यवरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार असून याही वर्षी दिनांक 15 जून 2024 रोजी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचे व दहावी व बारावी नंतर काय या विषयावर डॉक्टर प्राध्यापक इंजिनीयर वकील व पोलीस प्रशासन या विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरील कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकाद्वारे तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी केले असून या सत्कार समारंभास बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क मेमोची झेरॉक्स व दोन पासपोर्ट फोटो व्हाट्सअप वर पाठवावे असेही आव्हान करण्यात आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !