पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 




 गेवराई (प्रतिनिधी) :- श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 मे रोजी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र गेवराई येथे अंकुशराव आतकरे यांचा गेवराई तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर इतर पदाधिकारी पत्रकार यांचा सत्कार थाटामाटा संपन्न झाला. यावेळी बहुसंख्य नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते तसेच सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व ग्राहक पंचायत चे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. तसेच दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

                  गेवराई तालुक्यातील मनमिळाऊ स्वभावाचे सर्व पत्रकारांना व सर्व सेवाभावी संस्थेला मार्गदर्शन वेळोवेळी त्यांच्या होणाऱ्या अडीअडचणी व पत्रकार मंडळीच्या अडीअडचणीसाठी सदैव उपलब्ध असणारे व सर्वांना मदत करणारे आमचे अंकुशराव आतकरे हे सलग बारा वर्षे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड असल्यामुळे सर्वांना आनंद द्विगुणीत होत आहे. याप्रसंगी अंकुशराव आतकरे, सुनील मुंडे, अनिल अंगुंडे, शिवनाथ काळे इत्यादी पत्रकार यावेळी उपस्थित होते. अनिल बोर्डे यांनी वरील मान्यवराचे स्वागत केले त्यानंतर त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी शालांत परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी वर्गाचा त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी असंख्य पालक वर्ग उपस्थित होता.

     यामध्ये कुलकर्णी कौशिकी महेंद्र 95 टक्के,      कणसे आरती शामराव 92.6 टक्के, कारगुडे पूजा अशोक 90.40, चाळक श्रुती बाळासाहेब  92.2 टक्के. ठोसर कल्याणी नारायण 89टक्के, पानखडे पायल दामोदर 88.8 टक्के, पंडित कुलदीप केशव    85.5 टक्के, वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी वर्गांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा कार्यक्रम वरील संस्थेने आयोजित केला होता यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी अनिल बोर्डे व श्री प्रा. भानुदास फलके यांनी मेहनत घेतली. तर विनोद चव्हाण सर यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले.   

   याप्रसंगी ग्राहक पंचायत बीड जिल्हा उपाध्यक्ष व जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई अध्यक्ष अनिल बोर्डे व ग्राहक पंचायत गेवराई अध्यक्ष प्रा. भानुदास फलके ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था कोषाध्यक्ष मोहनराव राजहंस, सहकार्य कार्यवाह कुंदा जोशी सदस्य सुलभा बोर्डे, ग्राहक पंचायत कार्यकर्ते अशोक देऊळगावकर, केशव पंडित, महेंद्र कुलकर्णी दामोदर पानखडे बालासाहेब चाळक शेख हनीफ भाई इत्यादी जनसमूह होता. पालक वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार