युवक नेते अजय मुंडे यांनी पुण्याच्या रुग्णालयात जाऊन महाजारांची घेतली प्रत्यक्ष भेट

 गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या तब्येतीची धनंजय मुंडे यांच्याकडून विचारपूस

महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा; युवक नेते अजय मुंडे यांनी पुण्याच्या रुग्णालयात जाऊन महाजारांची घेतली प्रत्यक्ष भेट


पुणे (दि. 23) - श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह भ प विठ्ठल महाराज शास्त्री यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला असून ते सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार घेत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज महाराजांशी व रुग्णालयातील डॉक्टरांशी दूरध्वनीवरून चर्चा करून महाराजांच्या तब्येतीची विचारपूस केली. 


मुंडे कुटुंबीयांच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते अजय मुंडे यांनी ह भ प विठ्ठल महाराज यांची पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे भेट घेऊन त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती घेतली. 


महाराजांच्या एका पायाला दुखापत झाली असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, अशी माहिती अजय मुंडे यांना डॉक्टरांनी दिली. 


दरम्यान राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील यावेळी महाराजांशी दूरध्वनीवरून चर्चा करत महाराजांच्या तब्येतीची तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली व विठ्ठल महाराजांना लवकर आराम मिळावा अशी सदिच्छा व्यक्त केली. 


धनंजय मुंडे व त्यांची यंत्रणा विठ्ठल महाराज शास्त्री यांचा अपघात झाल्यापासून महाराजांच्या संपर्कात असून त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार केले जात आहेत, तसेच त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार