धीजरकुमार पथकाची मोठी कारवाई:अवैध वाळू उपसा : कोट्यावधींचा मुद्देमाल पकडला

 धीजरकुमार पथकाची मोठी कारवाई:अवैध वाळू उपसा :  कोट्यावधींचा मुद्देमाल पकडला



बीड, प्रतिनिधी.....
     अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असताना सपोअ उपविभाग माजलगावचे धीजरकुमार पथकाने मोठी कारवाई करत पावणेदोन कोटीचा मुद्देमाल पकडला  आहे.

      याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दिनांक 21/05/2024 रोजी डॉ. बी.धीजरकुमार सपोअ उपविभाग माजलगाव यांना  गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली आहे की, काही हायवा राक्षसभुवन येथुन अवैध वाळू उपसा करुन उमापुर मार्ग अहमदनगर येथे घेवुन जात आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाली असुन तुम्ही व कार्यालयातील पोकॉ/661 कानतोडे, पोकॉ/2159 मिसाळ असे सोबत जावुन कार्यवाही करा असे आदेशीत केल्याने आम्ही खाजगी वाहनाने रवाना होवुन 00:30 वा. सुमारास ठाकुरवाडी तांडा शिवारातील रोडवर राक्षसभुवन ते उमापुर जाणारे रोडवर एका पाठीमागे एक असे तीन भारत बेंझ हायवा अवैध गौण खनिज वाळुची चोरटी वाहतुक करीत असतांना पथकाने पकडले पैकी चालक नामे ।) शाहरुख शबीर पठाण वय 25 वर्षे रा. चकलांबा ता. गेवराई जि.बीड याचे ताब्यात असलेला विना पासींग भारत बेंझ हायवा मध्ये अंदाजे सात ब्रास वाळु असलेला हायवा 2) हायवा क्र एम.एच 23 ए.यु 3662 चा चालक नामे दत्ता राजेंद्र कुडुक रा. शेपटा ता. गेवराई जि.बीड याचे हायवात अंदाजे पाच ब्रास वाळु कि. अंदाजे 30000/- रुपये व हायवा कि. अंदाजे 3500000/- रुपये असे एकुण 3530000/- रुपयाचा माल 3) हायवा क्र एम.एच 21 डी. एच 8833 चे चालक नामे नफील वजीर पठाण रा. चकलांबा फाटा ता. गेवराई जि.बीड याचे ताब्यात पण पाच ब्रास अवैध वाळुची चोरटी वाहतुक करीत असतांना मिळुन आला त्याची हायचा व वाळूसह कि. 3230000/- रु चा मुद्देमाल असा एकुण 10800000/- रुपये  हस्तगत करण्यात आला.
         चालक नामे शाहरुख शबीर पठाण याचे ताब्यातील ओपो कंपनीचा जुना वापरता मोबाईल कि. अंदाजे 10000/- रुपये असा एकुण 10810000/- रुपये असा किमतीचा मुद्देमाल घेवुन जात असतांना चकलांबा शिवारातील डांबरी रोडवर विना पासिंग काळ्या रंगाची स्कारपिओ मधुन विना पासिंग हायवाचा मालक नामे शेख अहमद महंमद रा.उमापुर याने रस्यात पोह/1640 देशमुख यांना कार्यवाहीसाठी घेऊन जात असलेल्या हायवाला आडवुन तुम्ही माझी गाडी कशी काय नेत आहात मी गाडी नेवु देत नाही. असे बोलुन व जाणीव पुर्वक हुज्जत घालुन अडथळा निर्माण करुन हायवा चकलांबा गावात आल्यावर सावता माळी चौकात सिमेंट रोडवर असलेल्या बाभळीच्या कुपाट्यावरुन हायवा जात नाही असे चालक शाहरुख पठाण याने बोलल्याने पोह/1640 देशमुख हायवाच्या खाली उतरुन कुपाट्या काढत असतांना शाहरुख शबीर पठाण चालवत असलेल्या विना पासिंग भारत बेंझ हायवा हा भरधाव वेगात जाणीव पुर्वक जिवे मारण्याच्या उद्देशाने देशमुख यांचे अंगावर घातला व जिवे मारण्याच्या प्रयत्न केला असता ते तत्परतेने बाजुला सरकले व तो पोलीसांच्या ताब्यातील पासिंगनसलेला हायवा व वाळु असा 4040000/- रु चा मुद्देमाल घेऊन पळून गेला. म्हणून नमुद हायवा चालक शाहरुख शबीर पठाण व नमुद हायवाचा मालक नामे अहमद महंमद शेख याने चिथावणी देवुन व संगनमत करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करुन जिवे मारण्याच्या प्रयत्न केला म्हणून पोह/1640 देशमुख यांनी पो.स्टे चकलांबा येथे गु.र.न. 147/2024 कलम 307,353,379,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिकचा तपास चकलांबा पो.स्टे चे प्रभारी अधिकारी करत आहेत,









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?