आई-वडिलांच्या ताटातुटीत मुलांची तारांबळ

मायबापांनी लाथाडलं; नातेवाईकांनी नाकारलं: तीन चिमुकले सैरभैर 


माजलगाव प्रतिनिधी दि.18


तीन चिमुकल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांनी माजलगाव तालुक्यातील पुंगनी गावच्या पुलावर रविवारी पहाटे बेवारस सोडून दिले.ही घटना रविवारी गावकऱ्यांच्या लक्षात आली. पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन अनाथ आश्रमात पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.दरम्यान आई-वडिलांच्या बेबनाव ताटातुटीत तीन चिमुकल्यांची मोठी तारांबळ होत आहे.

         याबाबत समजलेली माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर जाधव यांचा माजलगाव तालुक्यातील पुंगनी येथील महिलेसोबत आंतरजातीय विवाह 2013 14 साली झाला होता.दरम्यानच्या काळात त्यांना आर्यन(वय 6 वर्षे)अनिकेत (4 वर्षे)व आराध्या (2 वर्ष) अशी तीन मुले झाली.उभयतांत काही दिवसापूर्वी वाद झाल्याची गावकऱ्यात चर्चा आहे.यामुळे मुलांचे वडील ज्ञानेश्वर मोठ्या शहरात वास्तवास गेले,तर आईने लेकरांना नातेवाईकाच्या हवाली सोडून  गेली दरम्यान काही दिवस नातेवाईकांनी मुलांना सांभाळले.परंतु आईबाप तिकडं मजा करत आहेत.आम्ही ही ब्याद का सांभाळायची?अशा भावनेने नातेवाईकांनी या तीन चिमुकल्यांना त्यांच्या आईचे गाव असणाऱ्या माजलगाव तालुक्यातील पुंगनी गावच्या पुलावर  सोडून दिल रविवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान.ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येतात त्यांनी माजलगाव पोलिसांना याची माहिती दिली.दरम्यान पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन बीडच्या बाल आश्रम ग्रहात त्यांना पोहोचण्याची व्यवस्था केली आहे.या कामी पोलीस कर्मचारी ऍटवाड, चव्हाण मॅडम,कापले मॅडम यांनी काम पाहिले.

       डॉक्टर कैलास काटवटे सरपंच आसाराम शिरसागर गोविंद शिंदे यांनी सदरील चिमुकल्यांना त्यांच्या अंगावर असल्याने तालखेड फाट्यावरील कपड्याच्या दुकानावर तिघांनाही कपडे घेतले खाऊ घेतला त्याचबरोबर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सहकार्य केले त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. 


पोलिसांनी त्या महिलेच्या माहेरी भावाला फोन केले असता भाऊ यांनी सांगितले की 2013 14 झाली तिने आंतरजातीय केल्यापासून आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नसल्याचे सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !