जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

व्हायरल....व्हायरल | video नंतर आता सोशल माध्यमातून अनावृत्तपत्र!

 मुंडेवाडीच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर सोशल मीडियातून एक अनावृत्तपत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल

बीड, प्रतिनिधी...
      बीड जिल्ह्यातील जातीय तेढीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.  मुंडेवाडी या केज तालुक्यातील गावाने मराठा समाजा बाबतीत एक ठराव घेतल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओवरून मोठ्या प्रमाणावर क्रिया- प्रतिक्रिया सुरू आहेत. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने मुंडेवाडी येथे भेट देऊन नागरिकांची समजूत काढली आहे. तसेच जातीय सलोखा कायम राहण्यासाठी सर्व स्तरातून आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतर आता सोशल माध्यमातून मराठा समाजाला उद्देशून एक अनावृत्तपत्र लिहण्यात आले असून हे अनावृत्तपत्र मोठ्या प्रमाणावर सोशल माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहे. 'मराठा समाजाला उद्देशून एका वंजारी ऊसतोड कामगाराच्या मुलाने लिहिलेले अनावृत्त पत्र' या मथळ्याखाली हे पत्र लिहलेले असुन विविध सोशल मीडियावर हे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतांना दिसत आहे.

■ नेमकं काय लिहिलंय या अनावृत्त पत्रात ?

मराठा समाजाला उद्देशून एका वंजारी ऊसतोड कामगाराच्या मुलाने लिहिलेले अनावृत्त पत्र

" माझ्या प्रिय 'मोठ्या भावा'...
                            राम राम .....

आमचा राम राम तरी घेणार आहेस का तो ही बंद केलास.....

मुंडेवाडी या एका गावच्या लोकांनी मराठा समाजाच्या व्यवसायिकतेवर बहिष्कार घातल्याचे कळताच रागावून लाल झालेलं तुला पाहिलं, मनाला कुतूहल वाटलं माझ्या की आपण जे आजवर पेरलं आज तेच रिऍक्शन होऊन फक्त एका गावात आपल्या अंगलट आलं तर किती वाईट वाटलं तुला! आता तुला सलोखा, गावगाडा, माणुसकीचा धर्म आठवायला लागला. पण मागील काही महिन्यांपासून आम्ही काय काय सहन केलंय ते बघ एकदा, म्हणजे तुला काही प्रश्न पडतील... आशा आहे की वाचून प्रतिक्रिया नक्की कळवशील.

आरक्षणाची तुझी लढाई तू लढत असताना आम्हीही किमान पाणी तरी पाजलेच की रे ...पण ओबीसी नेत्यांची लेकरं-बाळ घरात असताना घरं पेटवून दिली गेली, तेव्हा माणुसकीचा धर्म कुठं गेला होता?

आमच्या ताईची, भाऊची घरे जाळण्याच्या जाहीरपणे धमक्या दिल्या जात होत्या, तेव्हा तुझ्यातला सलोखा कुठं होता?

अरे मराठा समाज बहुल असलेल्या गावात ओबीसी-बलुतेदार मेला तर त्याच्या मातीला जाणं बंद केलं तुम्ही, एका गावात दोन-दोन पार केले तुम्ही, तेव्हा कुठं गेला होता सलोखा?

ह्यांचे दवाखाने नको, डॉक्टर-वकील नको, दुकान नको, हे फतवे तर आधीच काढले की तुम्ही गावागावात, व्हाट्सअप्प वरून...!

निवडणूक लागली तसे ह्यांना पाडा, तुम्ही आहेतच किती? हलक्या जातीचे, छोट्या जातीचे म्हणून कुणी-कुणी कितीदा हिनवलं रे आम्हाला, तेव्हा माणुसकी धर्म कुठं होता? त्याला जातीवाद म्हणत नाहीत का?

एका एका गावात, त्या बिचाऱ्या आमच्या ताईला झुंडी करून ठरवून अडवलं तुम्ही, तोंडावर घोषणाबाजी करून अपमानित करून हाकलून दिलं तुम्ही, तेव्हा माणुसकी धर्म कुठं होता? तेव्हा कितीरे असुरी आनंद घेतलास? अरे कधीतरी बजरंग सोनवणेला अडवून विचारलं का, आरक्षणाच्या लढाईत तुझं काय योगदान आहे म्हणून? ताई वंजाऱ्याची म्हणून तिलाच अडवलंत फक्त, तो जातीवाद नव्हता का? अरे जिल्ह्यात कुठंतरी वंजारी किंवा इतर कुठल्या ओबीसीने बजरंगला अडवले का? नसते जमले का आम्हाला, आमच्या गावात आल्यावर? केलास का कधी विचार?

आम्हाला हलक्या जाती म्हणून मोठमोठे नेते हिनवत होते तेव्हा कितीरे गुदगुल्या झाल्या तुम्हाला?

जरांगे पाटलांचे आंदोलन या वर्षभरात गाजलेले पण मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढलेला, प्रसंगी आरक्षणावर भाषण करताना रक्ताच्या उलट्या केलेला आमचा धनु भाऊ सुद्धा टोचला तुम्हाला. अरे किती  आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, असे किती किती सहकारी मोठे केले ताईने आणि भाऊने, आणि आमच्या मोठ्या साहेबांनी.... त्यांचा समाज बघून का? स्व. मुंडे साहेबांना धनुभाऊ नी सोडलं ते मराठा समाजातल्या देशमुखांना नगराध्यक्ष करण्यासाठीच ना ! त्या भाऊच्या नावाने सुद्धा द्वेष पेरला तुम्ही?

अरे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाती काढून हिनवले, पण त्याच अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात सर्वात जास्त, 82 हजार पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र वाटलेत, त्याचा मात्र सपशेल विसर पडला तुम्हाला?

मराठा आंदोलन पेटल्यानंतर ओबीसींचे सुद्धा मेळावे होऊ लागले, पण जातीय सलोखा बिघडू नये म्हणून ताई किंवा भाऊ त्या मेळाव्याला गेले नाहीत, पण ते तुला दिसलं नसेल!

बरं वंजाऱ्यांना विरोध म्हणून ताई-भाऊला विरोध असेल इथपर्यंत समजलं मला, पण यार भाजपला का मतदान केलं म्हणून तुम्ही बिचाऱ्या नाभिकांची दुकाने फोडली, ब्राम्हणांच्या घरांवर हल्ले केले? कोणत्या माणुसकीच्या धर्मावर हे घडलं, सांगशील का?

आठवतंय का भावा तो 'जयोस्तु मराठा' नावाच्या व्हाट्सप ग्रुपला मतदानाच्या आदल्या दिवशी तुमचा तो संवाद, वंजारी, धनगर, माळी, बंजारा यांना मतदान करायला येऊ देऊ नका, आले की ठोका, अमुक-तमुक... बरंच काही होतं घाण-घाण पण ते इथं लिहिण्यासारखं नाही, आठव जरा ती दहशत, आमच्याबद्दल वापरलेली शिवी गाळीची भाषा... द्वेष आणि तो उन्माद, ते सगळं पटलं का तेव्हा मनाला तुझ्या?

तुमचा विरोधी उमेदवार म्हणतो मुंडे, बांगर, दहिफळे मतमोजणीला नकोत, मग आम्ही काय म्हणून इतरांवर विश्वास ठेवायचा? आम्ही पण म्हणायचं का मराठा नकोत? कधीतरी त्याला असं वागू नकोस म्हणून सल्ला द्यायची हिम्मत केलीस का? राहून राहून आम्हालाच का सजा देता?

एक इंजेगाव बोगस मतदान झालं म्हणून राष्ट्रीय पातळीवर तुम्ही बदनाम केलं  तुम्ही.... तेव्हा मसाजोग, जवळबन, सारणी, आनंदगाव, हाजीपुर, गाजीपुर अशा 27 पेक्षा जास्त गावात तुम्ही दिवसभर ढोल वाजवून सांगत होतात की आम्ही अख्खे गावं ताब्यात घेतलीत,  तेव्हा लोकशाही कुणी तुडवली होती? त्याचा नाही जाब विचारणार तुम्ही?

आज मुंडेवाडी गावाने जे केलं ते एका ऍक्शनची रिऍक्शन आहे, होय आहेच! त्या गावाला वेढलेल्या आजूबाजूच्या गावांनी जी हीन वागणूक मुंडेवाडीच्या लोकांना आजवर दिली त्याचीच परतफेड करण्याचा ठराव गावकऱ्यांनी घेतलेला दिसतोय. नांदूर फाट्यावर मुंडे वाडीकरांना मागील काही महिन्यात काय काय भोगाव लागलंय ते जाऊन पहा प्रत्यक्षात, मग कळेल. आता आठव ना गावोगाव पारावर बसून घेतलेल्या शपथा, गावोगाव केलेले ठराव, मुंडे येऊ द्यायचे नाही, त्यांना मत मागायला आले तरी हाकलून द्यायचे, त्यांना मदत करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा बहिष्कृत करायचं, हे सगळं कुणी पेरलं रे?

आज ठरवून काहीजण मुंडेवाडीच्या आडून सलोख्याचे दुकान मांडत आहेत, गावातले व्हीडिओ मीडिया मध्ये त्यांनीच पेरले आहेत. म्हणजे पुन्हा आम्हाला बदनाम करण्याची ही एक संधी तुम्ही बनवलीय!

अरे तुमच्याच कारखान्यांवर ऊस तोडून, काबाड कष्ट करून जगणारा आमचा भोळा-भाबडा आणि हलका समाज, आज इतका का परका आणि वैरी वाटू लागला तुम्हाला?

गावगाडा आणि गाव कुसावरचा 'राम राम' बंद पडू नये ही माझी पण मनोमन इच्छा आहे पण ती तुझीही मनातून इच्छा असेल व पूर्ण करायची असेल तर मोठ्या भावाने मनाचा मोठेपणा सुद्धा दाखवावा लागेल, सगळं विसरून पुढं जाऊ भावा, फक्त आमच्या भावना समजून घे, आम्हाला हलके म्हणून हिनवू नको, तू जेव्हा इतरांच्या भावनांचा सन्मान करशील तेव्हा लोक तुझाही सन्मान करतील...

बघ मनाला पटतंय का?

तुझाच एक हलका
लहान भाऊ "

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?